शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पक्षीजीवाला माणुसकीतून ओलावा : कऱ्हाडात पक्ष्यांसाठी पाणपोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:15 AM

कऱ्हाड : उन्हाच्या कडाक्यामुळे आपल्या घशाला कोरड पडतीय, तर मग पक्ष्यांचे काय होत असेल ! जसं घोटभर पाण्यासाठी आपली तगमग होते. तशीच त्यांचीही होते.

ठळक मुद्देसिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा चिवचिवाट; शिंदे कुटुंबीयांच्या अंगणात पक्ष्यांचे थवे

संतोष गुरव ।कऱ्हाड : उन्हाच्या कडाक्यामुळे आपल्या घशाला कोरड पडतीय, तर मग पक्ष्यांचे काय होत असेल ! जसं घोटभर पाण्यासाठी आपली तगमग होते. तशीच त्यांचीही होते. अशा पाण्यावाचून हाल होणाऱ्या पक्षीजीवाला माणुसकीतून ओलावा देण्याचं काम काही कºहाडकर नागरिकांकडून केलं जातंय. येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील नागरिकांनी पक्ष्यांसाठी भोजनगृह बनवलंय तर दररोज सकाळी अनेक पक्ष्यांची दिवसाची सुरुवात शिवाजीनगरमधील सुनीता शिंदेंच्या घरी बे्रकफास्ट केल्याशिवाय होत नाही.

शहरातील शिवाजी हौसिंग सोसायटीत राहणाºया अनेक कुटुंबीय तसेच नागरिकांनी दाराबाहेर, खिडकी किंवा अंगणात येणाºया पक्ष्यांसाठी छोटे-मोठे कृत्रिम पाणवठे तयार केलेत. तर सल्लाउद्दीन मुश्रीफ यांनी चक्क ईदगाह मैदान परिसरात पक्ष्यांसाठी गाड्यांच्या बॅटरीचे पाणवठे, सिमेंटचे जलकुंभबनवले आहेत. यांच्याप्रमाणे अनेकांपैकी कुणी झाडालाउंच मडके टांगले आहेत. तर कुणी प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटलमधोमध कापून त्यापासून पक्ष्यांना पाण्याचे छोटे भांडे बनविले आहे.

पक्ष्यांविषयी प्रेम असल्यामुळेच गेल्या दहा वर्षांपासून आमच्या घरी अनेक पक्षी सकाळी सकाळी नाष्टा करण्यासाठी न चुकता हजेरी लावतात. बुलबुलची जोडी तर पाणवठ्यामध्ये मनसोक्तपणे अंघोळही करते. कावळा, कोकीळ, चिमणी यांच्याबरोबर अनेक पक्षी पाणी पिण्यासाठी येतात, हे शिवाजीनगर येथे राहत असलेल्या सुनीता शिंदे या त्यांच्याकडे येणाºयांना खूप आनंदाने सांगतात.

त्या अंगणामध्ये तसेच घरापाठीमागील जागेत पक्ष्यांसाठी पाण्यासोबत खाऊही ठेवत आहेत. अन्न तसेच पाणी मिळत असल्याने त्यांच्या अंगणात दररोज सकाळी पक्ष्यांची शाळा भरू लागलीय. संक्रातीच्या सणाला वापरल्या जाणाºया सुगड्या, लहान मडके, प्लास्टिकचे कॅन किंवा बॉटल हे मधोमध कापून त्यामध्ये पाणी ठेवल्यास पक्षी व लहानपाळीव प्राणी ते आनंदाने पितात, अशा या नागरिकांकडून पक्ष्यांविषयी चांगलीच काळजी घेतली जात  आहे.कृत्रिम घरटे बनविण्याची कार्यशाळापक्षी तसेच चिमणी वाचवाचा संदेश देत कºहाड येथे २०१४ रोजी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनविण्याची कार्यशाळा घेतली होती. यावेळी विविध संस्थांबरोबर एन्व्हायरो क्लबनेही यात सहभाग घेतला होता. त्यावेळी पक्षी अभ्यासक डॉ. उमेश करंबेळकर यांनी मुलांना पक्ष्यांविषयी व घरट्यांविषयी मार्गदर्शन केले होते.पक्ष्यांसाठी भोजनगृहाची सोय..येथील शिवाजी उद्यानात वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दररोज विविध जातींचे पक्षी येत असतात. त्यांच्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी भोजनगृहाची व पाण्याची सोय केली आहे. हिरवळ व पाण्याची सोय असल्याने येथे पक्ष्यांचा सारखा किलबिलाट असतो.प्लास्टिकच्या बाटल्यांचाही चांगला उपयोगशहरात मोठ्या प्रमाणात आढळणाºया प्लास्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर हा पक्ष्यांच्या पाण्यासाठी चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. या बाटल्या आडव्या कापून त्यात पाणी सोडून त्या झाडांना टांगल्यास त्यातून पक्षी सहजरीत्या पाणी पिऊ शकतील.सह्याद्री व्याघ्रचाही पक्षी वाचविण्यासाठी हातभारयेथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील उद्यानात पक्ष्यांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानेही सहकार्य केले आहे. त्यांच्या माध्यमातून २० मार्च २०१७ रोजी जागतिक चिमणी दिनानिमित्त झाडावरील पक्ष्यांचे भोजनगृह व पाणपोया देण्यात आलेल्या आहेत. वर्षभरापूर्वी दिलेले भोजनगृह आजही उद्यानात ठिकठाक आहेत. 

सध्या उन्हाळा ऋतू असल्यामुळे पक्ष्यांना या ऋतूत पाण्याची कमतरता भासत असते. ग्रामीण भागात नद्या, विहिरी असल्यामुळे तेथे पाणी मुबलक प्रमाणात आढळते. याउलट शहरात पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासते, अशा पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.- सुनीता शिंदे, गृहिणी, शिवाजी नगर, कºहाड