शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Bird Flu in Maharashtra: साताऱ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; कोंबड्याची विल्हेवाट लावण्याची सूचना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 14:05 IST

मरिआईचीवाडीतील अहवाल बाधित

सातारा : राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढत असतानाच सातारा जिल्ह्यातही आता शिरकाव झाला आहे. खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील मृत कोंबड्यांचा अहवाल बाधित आला आहे. त्यामुळे आता एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या शास्त्रोक्त पध्दतीने मारुन त्यांची विल्हेवाट लावण्याची सूचना करण्यात आली आहे. तर हणबरावाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे.मागील १५ दिवसांपूर्वी देशात बर्ड फ्लूने शिरकाव केला. अनेक राज्यात बर्ड फ्लूने कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लूने कोंबड्या मृत झाल्या. त्यामुळे सर्वत्रच खबरदारीची सूचना करण्यात आली होती. असे असतानाच आता सातारा जिल्ह्यातही बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या मरिआईचीवाडी आणि कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडीमधील काही कोंबड्या मृत झाल्या होत्या. या मृत कोंबड्यांचा अहवाल भोपाळ येथून प्राप्त झाला आहे. त्यानुसार मरिआईचीवाडीतील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मृत कोंबड्यांच्या एक किलोमीटर परिसरातील जवळपास ३ हजार कोंबड्या शास्त्रोक्त पध्दतीने मारण्यात येणार आहेत. तसेच त्यांची विल्हेवाट केली जाणार आहे. तर हणबरवाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हणबरवाडी भागातील भीतीचे वातावरण काहीसे कमी झाले आहे.

हिंगणी, बिदालचा अहवाल बाकी...

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. यामधील दोन ठिकाणचा अहवाल प्राप्त झाला. तर माण तालुक्यातील हिंगणी आणि बिदाल येथील मृत कोंबड्यांचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूSatara areaसातारा परिसर