शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्लू: हिंगणी अन् बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह; शिरवळमधील कावळ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 14:11 IST

बर्ड फ्लू: शिरवळमधील कावळ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा 

सातारा : माण तालुक्यातील हिंगणी आणि बिदालमधील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील भीतीचे वातावरण कमी झाले आहे. तर सध्या शिरवळमधील मृत कावळ्यांचा अहवाल भोपाळहून येणे बाकी आहे. 

जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यात हणबरवाडी, खंडाळा तालुक्यातील मरिआईवाडी आणि माण तालुक्यामधील हिंगणी व बिदालमध्ये काही कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने या मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. दोन दिवसांपूर्वीच हणबरवाडी आणि मरिआईचीवाडीतील कोंबड्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार हणबरवाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर मरिआईचीवाडीतील पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे मरिआईचीवाडीतील ४७९ कोंबड्यांना शास्त्रोक्त पध्दतीने मारुन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. 

गुरूवारी सकाळी माण तालुक्यातील दोन गावांतील मृत कोंबड्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानुसार हिंगणी व बिदाल येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामुळे ग्रामस्थ व शेतकºयांतील भीतीही कमी होण्यास मदत झाली आहे. तर शिरवळमध्ये दोन कावळे मृत झाले होते. त्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल येणे बाकी आहे. 

जिल्ह्यातील मरिआईचीवाडीमधील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण, इतर तीन गावांतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे. माणमधील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. - डॉ. अंकुश परिहार, उपायुक्त जिल्हा पशूसंवर्धन विभाग

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूSatara areaसातारा परिसरMaharashtraमहाराष्ट्र