शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेने वानर कोमात, दुचाकीस्वार पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 15:59 IST

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप गावाच्या फाट्यावर अज्ञात दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या वानराला जोरदार धडक दिली. या अपघातात वानराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, ते कोमात गेले आहे.

ठळक मुद्दे दुचाकीच्या धडकेने वानर कोमात, दुचाकीस्वार पळालारहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप फाट्यावर घटना

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप गावाच्या फाट्यावर अज्ञात दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या वानराला जोरदार धडक दिली. या अपघातात वानराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, ते कोमात गेले आहे.रहिमतपूर-औंध रस्त्यांवरील साप फाटा येथून गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वानर रस्ता ओलांडत असताना वेगात आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने वानराला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे वानर काही अंतरावर जाऊन कोसळले आणि बेशुद्ध झाले. या अपघातामध्ये वानराच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन रक्त वाहू लागले.

यावेळी रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक व आजूबाजूला असलेल्या स्थानिक नागरिकांनी जखमी वानराला रहिमतपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रहिमतपूरचे वनपाल संदीप जोशी व वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याकडे धाव घेतली.

पशुवैद्यकीय अधिकारी उमेश मस्के यांनी जखमी वानराची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. तसेच गंभीर दुखापत झाल्याने वानर कोमात गेले असून, अधिक उपचारासाठी पुणे येथे घेऊन जाण्यास सांगितले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जखमी वानराला रहिमतपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात देखरेखीखाली ठेवले आहे.वानरावर कात्रज, पुणे येथे उपचार होणारअपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या वानराला शुक्रवारी दुपारी कात्रज (पुणे) येथील प्राण्यांच्या अनाथ आश्रमात नेऊन अधिक उपचार केले जाणार आहेत. वानराला धडक देऊन पळून गेलेल्या दुचाकीस्वाराचा तपास केला जात असल्याची माहिती रहिमतपूरचे वनपाल संदीप जोशी यांनी दिली. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर