शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

गळ्यावर आलं ते बोटावर निभावलं; चायनीज मांजा कापल्याने दुचाकीस्वार जखमी, साताऱ्यातील तरडगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:01 IST

रुमाल फाडून मांजा गळ्याला आलेला सोडवताना दुखापत

तरडगाव : दुचाकीवरून घरी निघालेल्या एका व्यक्तीला तरडगाव येथे चायनीज मांजा कापून हाताच्या बोटांना दुखापत झाली. ही घटना रविवारी घडली. नितीन दत्तात्रय शिंदे (वय ४७), असे जखमीचे नाव आहे.नितीन शिंदे (रा. कोपर्डे, ता. खंडाळा, हल्ली रा. पाच सर्कल, ता. फलटण) हे कोपर्डे येथील मूळगावी रविवारी शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतातील काम आटोपून ते आपल्या आत्यासोबत दुचाकीवरून पाच सर्कल येथे जाण्यासाठी निघाले. सायंकाळी सातच्या सुमारास तरडगाव ओढ्यावरील पुलाजवळ आल्यावर त्यांच्या गळ्याला चायनीज मांजा अडकला. तोंडाला बांधलेला रुमाल कापून मांजा गळ्याला लागताच त्यांनी चटकन हाताने मांजा धरून स्वतःचा बचाव केला. यामध्ये गळ्याला थोडी दुखापत झाली. मात्र, हाताच्या चार बोटांना इजा होऊन मोठ्या जखमा झाल्या. घटनेनंतर शिंदे यांना तत्काळ येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बंदी असताना मांजाचा वापरपतंग उडविण्यासाठी चायनीज मांजास बंदी आहे. मात्र, तरी मुले तो वापरताना दिसतात. पोलिस प्रशासनाकडून मांजाचा वापर टाळावा, अशी जनजागृती केली जाते, तरी अशा घटना घडतात. त्या टाळण्यासाठी चायनीज मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.