शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात वकिलांची दुचाकी रॅली, उद्या ट्रॅक्टर रॅली

By सचिन काकडे | Updated: November 1, 2023 17:27 IST

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी सातारा ...

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये पाचशेहून अधिक वकील सहभागी झाले.आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला संपूर्ण राज्यातून मराठा बांधवांचा पाठिंबा मिळत आहे. सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलने सुरू झाली आहेत. गावागावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली असून, सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर बुधवारी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता सातारा जिल्हा न्यायालयाच्या आवारातून रॅलीला सुरुवात झाली. यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे पोवई नाका येथे आली. येथे  छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर रॅली राजपथाकडे मार्गस्थ झाली. गोलबागेला वळसा घालून  मोती चौक ,पाचशे एक पाटी, पोलिस मुख्यालय मार्गे पोवई नाका आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालय असा रॅलीचा मार्ग होता. वकिलांच्या शिष्टमंडळाने मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही सध्याची गरज आहे. त्या दृष्टीने संपूर्ण सातारा जिल्हा बार असोसिएशन आपल्या पाठीमागे ठामपणे उभे आहे, असे आश्वासन असोसिएशनच्या वतीने समितीला देण्यात आले.

उद्या ट्रॅक्टर रॅली..मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ उद्या गुरुवारी (दि. २) मराठा क्रांती मोर्चा, राजधानी साताराच्या वतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून या रॅलीस प्रारंभ होईल. बॉम्बे रेस्टॉरंट, जिल्हा परिषद, गोडोली, पोवई नाका, नगरपालिका, राजवाडा, खनआळी, पोलिस मुख्यालय, शिवतीर्थ ते आंदोलन स्थळ असा रॅलीचा मार्ग असणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षणadvocateवकिल