शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येतील, एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

By दीपक शिंदे | Updated: October 31, 2022 22:18 IST

Eknath-Shinde : ‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

- दीपक शिंदेसातारा - ‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत बोलणी सुरु आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी दरे खुर्द येथे उत्तरेश्वर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी त्यांनी महाबळेश्वर येथे बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते सायंकाळी मूळगावी पोहचले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील काही मोठे प्रकल्प बाहेर गेले यासाठी केवळ आमचे सरकार जबाबदार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे याबाबत मी फारसे बोलणार नाही. पण, लवकरच काही प्रकल्प राज्यात येतील. याठिकाणच्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करुन देणे, तरुणांच्या हाताला काम देणे यासाठी आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कामाने सर्व टीकांना उत्तरे देऊ. त्यांनी टीका करत राहायचे आणि आम्ही काम करत राहू असेही ते यावेळी म्हणाले.

अतिवृष्टीमुळे लोकांच्या हातात आलेले पीक वाया गेले आहे. याबाबत आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही निकष बदलून भरपूर मदत करण्याचे काम हे सरकार करत आहे. यापूर्वी कधीही एवढी मदत मिळाली नव्हती तेवढी मदत देण्याचे काम आम्ही करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम हे सरकार करत असून त्यांच्याबाबत आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हटले तरी आम्ही आमच्या कामापासून मागे हटणार नाही. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे हेच लक्षात ठेवून आमचे काम सुरु आहे.

राज्यातील बळीराजा आणि जनता सुखी राहू देमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावाजवळील उत्तरेश्वर या देवाची मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवाकडे काय मागणी केली असे विचारले असता देवाकडे काही मागावे लागत नाही. त्याला सर्व कळते. तरीही या राज्यातील गोरगरीब जनता, बळीराजा सुखी राहू दे, त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण कायम येऊ देत अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSatara areaसातारा परिसर