शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

बिग बॉसचे बॉउन्सर साताऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:58 IST

बिग बॉसमधून अटक केलेल्या अभिजित बिचुकलेची शनिवारी दुपारी साडेचार वाजता कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली. दरम्यान, बिग बॉसमधील बॉउन्सर त्याला नेण्यासाठी साताऱ्यात आले असून, त्याला मुंबईला नेले जाणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. श्रीकांत हुटगीकर यांनी दिली.

ठळक मुद्देअभिजित बिचुकलेची कळंबा कारागृहातून सुटका बिचुकलेच्या वकिलांची माहिती

सातारा : बिग बॉसमधून अटक केलेल्या अभिजित बिचुकलेची शनिवारी दुपारी साडेचार वाजता कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली. दरम्यान, बिग बॉसमधील बॉउन्सर त्याला नेण्यासाठी साताऱ्यात आले असून, त्याला मुंबईला नेले जाणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. श्रीकांत हुटगीकर यांनी दिली.अभिजित बिचुकलेवर शासकीय कामात अडथळा आणणे तसेच चेक बाऊंस, खंडणी असे तीन गुन्हे दाखल होते. खंडणीच्या गुन्ह्यातील फिर्यादिने तक्रार मागे घेतल्याने बिचुकलेची या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाली. उर्वरित दोन्ही गुन्ह्यांमध्येही त्याला जामीन मिळाला होता.

शनिवारी दुपारी त्याची सुटका झाल्याने त्याला आणण्यासाठी त्याची पत्नी आणि अन्य नातेवाईक कोल्हापूरला रवाना झाले होते. शनिवारी दुपारी साडेचार वाजता बिचुकलेची कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला खासगी गाडीने साताऱ्यात आणण्यात आले.अभिजित बिचुकलेला जामीन मंजूर झाल्याचे समजताच बिग बॉसमधील अनेकजण बिचुकलेचे वकील श्रीकांत हुटगीकर यांच्या संपर्कात होते. त्याला मुंबईला नेण्यासाठी आम्ही सातारला येत आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा बिग बॉसमधील बाउंन्सर बिचुकलेला नेण्यासाठी साताऱ्यात आले.

टॅग्स :abhijeet bichukaleअभिजीत बिचुकलेSatara areaसातारा परिसर