शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शोधायला गेले दुचाकीस्वार, घाटात सापडले प्रेमवीर!

By प्रगती पाटील | Updated: December 20, 2023 18:53 IST

घराबाहेर असणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा विषय एेरणीवर

सातारा : सुसाट गाड्या चालवून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी गस्तीला बाहेर पडलेल्या पोलिसांना प्रेमीयुगूलांनी चक्रावून सोडले. सुनसान आणि अंधारा असलेल्या यवतेश्वर घाटातील कठड्यांवर प्रेमी युगूल बिनधास्त बसलेले पोलिसांना आढळून आले. विशेष म्हणजे काही अल्पवयीन मुलीही क्लास आणि मैत्रीणींच्या नावाने येथे सापडल्याने पोलीसही अवाक झाले.सातारा शहर व परिसरात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमागे बेफाम वेग हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बेदरकार वाहन चालविणाऱ्यांवर कारवाइ करण्याच्या उद्देशाने यवतेश्वर घाटातून मार्गस्थ होणाऱ्या पाेलिसांच्या गाड्या प्रेमीयुगूलांना पाहून थांबले. रात्री उशीरा घराबाहेर कसे सोडले या प्रश्नावर युगूलांनी दिलेली उत्तरे धक्कादायक होती. आवश्यक माहिती घेतल्यानंतर पालकांना बोलावून या युगूलांना सोडण्यात आले.कोणी क्लासला तर कोणी मैत्रीणीकडेयवतेश्वर घाटातील कठड्यावर रात्री उशीरा बसणाऱ्यांमध्ये महिला आणि मुलींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. गस्तीच्या दरम्यान आढळून आलेल्या महिलांकडे रात्री उशीरा काय सांगून घराबाहेर पडला असे पोलिसांनी विचारले. त्यावर काही तरूणींनी एकस्ट्रा क्लास आहे, मैत्रीणीबरोबर खरेदी करायला बाहेर आलोय, मैत्रीणीच्या घरी बसून अभ्यास करतोय अशी कारणे सांगितली. यातील धक्कादायक बाब म्हणजे रात्री नऊ पर्यंत घराबाहेर असलेल्या अल्पवयीन मुलींच्या बाबतही पालक निश्चिंत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 रात्रीच्यावेळी बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्यांवर आळा बसविण्याच्या उद्देशाने गस्त घालत असताना यवतेश्वर घाटात प्रेमीयुगूले आढळून आली.  अंधारात नशेच्या अंमलाखाली असणाऱ्यांकडून तरूणींच्या बाबत चुकीचे काहीही होऊ शकते याचे भान तरूणांसह कुटूंबियांनीही ठेवावे. रात्री उशीरा मुलींना निर्जनस्थळी जाण्यापासून पालकांनीही अटकाव करावा. - विश्वजीत घोडके, तालुका पोलीस निरिक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस