शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कासच्या शिवारात घुमताहेत भलरीचे स्वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST

पेट्री : कास परिसराच्या डोंगरमाथ्यावर भातलावणीस वेगाने सुरुवात झाली असून, शेतकरी डोक्यावर इरले, पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात ...

पेट्री : कास परिसराच्या डोंगरमाथ्यावर भातलावणीस वेगाने सुरुवात झाली असून, शेतकरी डोक्यावर इरले, पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त आहेत. भाताच्या शिवारात ‘रामा हो रामा ..रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरमिरी-झिरमिरी.. माझ्या बंधूच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं, ध्यान मला रामाचं.. मारुतीला रात्र झाली द्रोणागिरी जायाचं, शंकर म्हणे पार्वते.. कुणाला तू ओढीत होतीस, कुणाला तू सोडीत होतीस, वाईच्या डोंगरी गजबारल्या तोरणी..!अशा कित्येक पारंपरिक भलरी गीतांचे स्वर निनादत आहेत.

कास, बामणोली घाटमाथा परिसर असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. जमिनी लाल मातीच्या, मुरमाड असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, नाचणी, वरी पिके घेतात. या भागातील जमिनी निकृष्ट, डोंगरउताराच्या तसेच लालमातीच्या असल्याने पिके चांगली येण्यास खूप मशागत करावी लागते. शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात ऐन, जांभूळ, उंबर अशा झाडांची कवळे बांधतात. होळी सणानंतर तरव्यांची भाजणी केली जाते. पावसाळ्याला सुरुवात होताच जून महिन्यात याच तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची पेरणी करून लावणीसाठी २१ ते ३० दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औताच्या साह्याने भाताच्या वावरात चिखल करून त्यामध्ये तरव्यांतील भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते.

डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भातलावणी करत आहेत. भातलावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये, यासाठी तालावर भलरी गीते म्हणत आहेत. भातलावणीसाठी अनेकांची आवश्यकता असल्याने एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळे भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस संध्याकाळी सातपर्यंत शेतातच मावळत आहे.

चौकट

‘पैरा’ परस्परांना मदत करण्याची प्रथा

वस्तू अथवा पैशाचा कोणताही मोबदला न घेता भात लावणी करण्यासाठी अनेकजण एकमेकांच्या कामासाठी मदत करतात. यालाच परिसरात ‘पैरा’ म्हणतात. यामुळे कमी वेळात भातलावणी होण्यास मदत होते. सर्वांच्या भातलावण्या सुरू असल्याने औताला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

(कोट)

संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. डोंगरमाथ्यावर वेळेत पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी भाताच्या पेरण्या झाल्या. सध्या रोपांची वाढ चांगल्याप्रकारे झाल्याने परिसरात भातलावणीच्या कामास वेग आला आहे. दोन-तीन आठवड्यांपर्यंत भातलावणी सुरू राहील. भातलावणी करताना आजही पारंपरिक भलरी गीते परिसरात अस्तित्व टिकवून आहेत. यामुळे कामाचा कोणताही ताण जाणवत नाही.

- ज्ञानेश्वर आखाडे, कुसुंबीमुरा, शेतकरी

१५पेट्री:

बऱ्याच दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. सध्या पावसाला सुरुवात झाल्याने भातलावणीस वेग आला आहे. (छाया : सागर चव्हाण)