लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरेगाव तालुक्यातील भक्तवडीच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती पुरूष आरक्षण बदलून मिळावे, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भक्तवडी ग्रामपंचायतीत १९९५ पासून आरक्षणाची सुरूवात झाली. १९९५ ते २००० पर्यंत अनुसूचित जातीमधील महिला सरपंच होती. त्यानंतर ओबीसी, महिला खुला वर्ग, खुला प्रवर्ग आरक्षण पडले. पण, १९९५ पासून २०२० पर्यंत अनुसूचित जाती पुरुष आरक्षण कधीही पडलेले नाही. त्यामुळे भक्तवडीचे सरपंचपद आरक्षण हे बदलून अनुसूचित जाती पुरूषासाठी मिळावे व आमच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी आहे.
या निवेदनावर भरत आवडे, किसन चव्हाण, बबन चव्हाण, विजय चव्हाण, शरद चव्हाण, मंगल चव्हाण, दिनेश आवडे, सागर आवडे, मनोज गायकवाड, महिपती बडेकर, भरत काकडे, सचिन खरात, पांडुरंग मोरे आदींच्या सह्या आहेत.
.....................................................