शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

भाजीमंडई की कोळसाखाण?

By admin | Updated: November 14, 2014 23:22 IST

गैरसोयीवर हायटेक उपाय : डोक्याला ‘हेडटॉर्च’ अन् मेणबत्त्यांच्या प्रकाशात ताजेपणाची पारख

सातारा : येथील पोवई नाका भाजी मंडईतील विक्रेते गेल्या अनेक महिन्यांपासून सायंकाळच्या वेळी अंधारातच भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे. यामुळे व्यवसायात येणारी अडचण दूर करण्यासाठी आता विक्रेतेही ‘हायटेक’ बनल्याचे दिसून येत आहे. खाणीमध्ये वापरण्यात येणारी ‘हेडटॉर्च’ डोक्याला बांधून तर कोणी मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात भाजीविक्री करताना दिसत आहे.समर्थ भाजीविक्री मंडईला लागून असणाऱ्या पोवई नाका भाजी मंडईत सेवा-सुविधांची वानवा आहे. या मंडईत बाहेरून व्यवसायासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी विजेची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे काही व्यावसायिकांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्राहकदेखील या मंडईकडे पाठ फिरविताना दिसतात. परिणामी, अंधारामुळे व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्वत: व्यावसायिकांनी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्याचे दिसून येत आहे. काही व्यावसायिक बॅटरीचा वापर करताना दिसत आहेत, तर काहीजण चक्क मेणबत्तीच्या प्रकाशात भाजीविक्री करीत आहे. आता याही पुढे जाऊन काही व्यावसायिकांनी चक्क खाणीमध्ये वापरण्यात येणारी ‘हेडटॉर्च’ डोक्याला बांधून भाजीविक्री करण्यास प्रारंभ केला आहे. याचे ग्राहकांना देखील कुतूहल वाटत आहे. या नव्या उपाययोजनेमुळे व्यावसायिकांचे नुकसान काही प्रमाणात का होईना टळत आहे. तसेच अंधाराची समस्याही दूर होत आहे. असे असले तरी प्रशासनामार्फत याठिकाणी विजेची पुरेशी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजीविक्रेत्यांची आहे. (प्रतिनिधी)ग्राहकांचीही होते तारांबळपोवई नाका भाजी मंडईतील सगळ्याच व्यावसायिकांना उजेडात बसता येत नाही. त्यामुळे काही जणांना अंधारात व्यवसाय करावा लागतो. याचा व्यवसायावर परिणाम होतो. काही विक्रेते रात्रीच्या वेळी मेणबत्तीचा वापर करतात. परंतु मेणबत्तीचा उजेड पुरेसा नसल्याने व्यावसायिक व ग्राहक दोघांची तारांबळ होताना दिसते.गेली अनेक दिवस मेणबत्तीच्या उजेडात भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे. दिवसा कसलीच अडचण येत नाही; मात्र रात्री मोठी अडचण निर्माण होते. हवेमुळे मेणबत्ती सारखी विझत असते. त्यामुळे मेणबत्ती लावायची की ग्राहकांकडे पाहायचे, अशी द्विधा मन:स्थिती होते.- अविनाश सुतार, भाजी विक्रेतामेणबत्तीच्या प्रकाशात काहीं विक्रेत्यांना विक्री करावी लागत आहे.पोवई नाक्यातील भाजीमंडईत काही भाजीविक्रेते खाणीमध्ये वापरण्यात येणारी ‘हेडटॉर्च’ डोक्याला बांधून व्यवसाय करत आहेत.