सातारा : कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तरीही नागरिकांमधील भीती अद्याप कमी झालेली नाही, असेच दिसत आहे. त्यामुळे जणू प्रवासी म्हणताहेत, ‘रेल्वेने प्रवास नको रे बाबा’ असेच चित्र दिसत आहे. गौरी-गणपतीत रेल्वेचे आरक्षण सहजासहजी मिळत नाही. पण यंदा कोणत्याही गाडीला सातारा जिल्ह्यातून आरक्षण करायचे असल्यास तत्काळ मिळते.
मुंबई, पुण्याचे तिकीट उपलब्ध
दरवर्षी रेल्वेचे गौरी-गणपती, दसरा, दिवाळीत आरक्षण करायचे असल्यास कित्येक दिवस प्रतीक्षा करावी लागते. यंदा मात्र चित्र उलटेच आहे. पुणे, मुंबईला सहज तिकीट मिळते.
गणपती विसर्जन रविवारी आहे. त्यामुळे सोमवार, दि. २० रोजी मिळणार नाही, अशी शक्यता होती. मात्र त्या दिवशीही रेल्वेचे आरक्षण उपलब्ध आहे.
उभी चौकट
सध्या रोज सुरू असलेल्या रेल्वे
nनिझामुद्दीन-गोवा
nमहाराष्ट्र एक्स्प्रेस
nमहालक्ष्मी एक्स्प्रेस
nकोयना एक्सप्रेस
nकोल्हापूर छत्रपती शिवाजी टर्मिनल स्पेशल ट्रेन
चौकट
कोल्हापूर दिशेला गर्दी कमीच
एकवेळ सातारा जिल्ह्यातून पुणे, मुंबईला प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या उलट कोल्हापूरच्या दिशेला प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे.
ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग
१. आरक्षण असल्याशिवाय रेल्वेने प्रवास करता येत नाही. प्रवास करताना अनेक प्रवासी स्वत:ची काळजी घेत नसल्याचे जाणवते.
२. मास्कचा वापर करण्याबाबत सक्ती असताना अनेकांचे मास्क हनुवटीवर असतात. अधिकारी समोर आल्यावरच मास्क वर जातो.
३. रेल्वेत सुरक्षित अंतर नियमांचे पालन केले जात असले, तरी रेल्वेस्थानक, फलाटावर प्रवाशांकडून सुरक्षित अंतर राखले जात नाही.
४. तिकीट काढताना दोन्ही लस घेतली आहे का याची खात्री केली जात नाही. ऑनलाईनवरून केवळ नाव टाकले की आरक्षण होते.