मोरगिरी, ता. पाटण येथे केंद्रप्रमुख पी. पी. साळुंखे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, सदस्य बबन कांबळे, उज्ज्वला लोहार, नगराध्यक्ष अजय कवडे, नथुराम मोरे, नाना मोरे, विस्तार अधिकारी प्रशांत अरबाळे, रमेश कांबळे, मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, प्रदीप घाडगे, प्रकाश साळुंखे, आदी उपस्थित होते.
राजाभाऊ शेलार म्हणाले, पी. पी. साळुंखे यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य भरीव असून, त्याची पोहोचपावती म्हणून त्यांचा हा गौरव होत आहे. त्यांच्या कामाचा आदर्श तालुक्यातील सर्व शिक्षकांनी घ्यावा.
यावेळी बबन कांबळे, शशिकांत कांबळे, भारत चव्हाण, भारत देवकात, शर्मिला लाड, प्रकाश साळुंखे, अंकुश नांगरे, वैशाली बेबले यांनी मनोगत व्यक्त केले. ता. रा. पवार यांनी प्रास्ताविक केले. गणपत शिंदे सूत्रसंचालन केले. रामचंद्र तडाखे यांनी आभार मानले.
फोटो : ०२केआरडी०६
कॅप्शन : मोरगिरी, ता. पाटण येथे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते केंद्रप्रमुख पी. पी. साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उज्ज्वला लोहार, राजाभाऊ शेलार, बबन कांबळे, प्रदीप घाडगे, अजय कवडे उपस्थित होते.