शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

बारामतीचं प्रेम आता वाठारमार्गे रेठºयात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : बारामतीकरांची ‘मती’ कधी कोणावर फिरेल, हे जसं सांगता येणं अवघड तसंच त्यांच प्रेमही कधी कोणावर बसेल, हे देखील सांगता येत नाही. कºहाड दक्षिणचच बोलायचचं म्हटलं बारामतीकरांच प्रेम वाठारमार्गे पुढे रेठºयाकडे कधी सरकलं, हे कोणालाच कळलं नाही. बुधवारी उत्तरेतील सभा उरकून दक्षिणेतील रेठºयात शरद पवारांनी कृष्णेचे माजी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : बारामतीकरांची ‘मती’ कधी कोणावर फिरेल, हे जसं सांगता येणं अवघड तसंच त्यांच प्रेमही कधी कोणावर बसेल, हे देखील सांगता येत नाही. कºहाड दक्षिणचच बोलायचचं म्हटलं बारामतीकरांच प्रेम वाठारमार्गे पुढे रेठºयाकडे कधी सरकलं, हे कोणालाच कळलं नाही. बुधवारी उत्तरेतील सभा उरकून दक्षिणेतील रेठºयात शरद पवारांनी कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांची घेतलेली भेट ही त्यामुळेच चर्चेचा विषय बनली आहे.खरं तर कºहाड दक्षिणमधील बारामतीकरांचे निष्ठावंत पाईक म्हणून नेहमी वाठारकरांकडे पाहिले जायचे. विलासराव पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राजेश पाटील हे देखील पवारांचाच ‘राग’ आळविताना दिसतात. पण दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रेठरेकरांकडे थोरल्या पवारांचे प्रेम जास्तच सरकल्याची चर्चा आहे.शरद पवारांच्या आजच्या भेटीने तर या चर्चांना दुजोराच मिळतोय.२०१५ च्या सुमारास कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. वाठारच्या माळावर थोरल्या पवारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यावेळी थोरल्या पवारांनी अविनाश दादांच्या घरी प्रीतिभोजन घेतले होते. त्यानंतर बुधवारीही उत्तरेत सह्याद्री कारखान्यावर साखर कामगारांच्या राज्य मेळाव्याला हजेरी लावून त्यांनी थेट रेठरे गाठले.पवारांच्या ऐनवेळच्या या दौºयामुळे राजकीय उलट-सुलट चर्चांना ऊत तर येणारच !सहकारातील ‘भीष्माचार्या’ची भेट महत्त्वपूर्ण !कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचारांचा आरोप माजी अध्यक्ष अविनाश मोहितेंसह त्यांच्या संचालक मंडळावर करण्यात येत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ होऊन काहिंना तुरुंगाची हवाही खावी लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सहकारातील ‘भिष्माचार्य’ असणाºया थोरल्या पवारांनी अविनाश मोहितेंची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. कºहाडमधील शरद पवार यांचा दौरा निश्चित असला तरी अविनाश मोहिते यांची भेट निश्चित नव्हती. अचानक पवार यांनी त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.आधी ‘डॉक्टर’ आता ‘इंजिनिअर’थोरल्या पवारांचं प्रेम तसं रेठरेच्या मोहितेंवर पहिल्यापासूनच होतं. फक्त यापूर्वी ते डॉक्टरांवर होतं. आता ते इंजिनिअर मोहितेंच्यावर जडलं आहे एवढचं. ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांचे सुपुत्र डॉ. इंद्रजित मोहितेंना साखर उद्योगाशी संबंधित अनेक संस्थांवर काम करण्याची संधी थोरल्या पवारांनी दिली. मात्र, डॉक्टरांनी राष्ट्रवादीत जाणे कटाक्षाने टाळले. याउलट आबासाहेब मोहिते यांचे वारसदार असणाºया इंजिनिअर अविनाश मोहिते यांनी दोन वर्षांपूर्वी थोरल्या पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधल्याने थोरल्या पवारांचे प्रेम त्यांच्यावर बसणे स्वाभाविकच आहे.उंडाळकरांना प्रेम कधी मिळणार?एकेकाळी जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते म्हणून ओळखल्या जाणाºया माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांना त्यांच्या पुतण्याने सोडचिठ्ठी देत धाकट्या पवारांच्या उपस्थितीत उंडाळ्यात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे दक्षिणेतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यात ‘आनंद’ पसरला. पण काय करणार ‘राव’ दीड वर्ष होऊन अजून उंडाळ्याच्या या वकील नेत्यांवर बारामतीकरांची कृपा झालेली दिसत नाही.मोळी टाकतानाच बांधली मोळी !थाकट्या पवारांनीही अविनाश मोहिते कारखान्याचे अध्यक्ष असताना कारखान्याची मोळी टाकण्याच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याच कार्यक्रमात अविनाशदादांना राष्ट्रवादीत घेऊन दक्षिणेत मोळी बांधण्याचा कदाचित त्यांनी संकल्प केला असावा. हा संकल्प पूर्णत्वाला गेल्याचे पाहायला मिळाले.वस्तूस्थिती जाणलीरेठरे येथे अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी पाऊण तासाची सदिच्छा भेट देऊन मी अविनाश मोहितेंच्या पाठिशी आहे. असाच संदेश थोरल्या पवारांनी अप्रत्यक्ष दिल्याचे अनेक राजकीय जाणकार सांगतात. रेठºयात नाष्टा करता करता पवारांनी अविनाश मोहितेंकडून याबाबतची वस्तूस्थिती जाणून घेतली.