कऱ्हाड : ‘जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राजकारण असू नये, असे मला वाटते. त्यामुळे शिवसेनेचे पॅनेल रिंगणात असणार का ? याबाबत पालकमंत्री विजय शिवतारे यांनाच विचारा,’ असे मत शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमदार देसाई म्हणाले, ‘जिल्हा बँक स्थापनेत लोकनेते बाळासाहेब देसार्इंचा मोठा वाटा आहे. त्या काळात बँक चांगली चालली, त्यानंतर आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांच्या नेतृत्वाखालीही बँकेचा कारभार चांगला झाला. ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असल्याने यात राजकारण आणू नये, असे वाटते.’ मग निवडणूक बिनविरोध व्हावी, असे तुम्हाला वाटते काय ? यावर त्यांनी ‘ते तुम्ही ठरवा,’ असे मत व्यक्त केले. अधिवेशन काळात आमदार जयकुमार गोरे यांच्या अटकेचा प्रश्न सभागृहात मांडलात याबाबत विचारले असता, ‘अधिवेशन काळात जर एखाद्या आमदाराला अटक करण्यात आली. तर सभागृहात लगेच सर्वांना माहिती द्यायची असते; मात्र ती माहिती चार दिवसांनी देण्यात आली, म्हणून मुद्दा उपस्थित केला.’ एवढेच उत्तर दिले. (प्रतिनिधी)
बॅँक निवडणुकीबाबत सेनेचे ‘बघू-करू’
By admin | Updated: April 12, 2015 00:43 IST