शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बंडातात्या कऱ्हाडकर यांना करवडीतील गोपालन केंद्रात स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 17:53 IST

Pandharpur Wari Police Satara : पंढरपूरच्या पायी वारीसाठी आग्रही असलेले आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अग्रणी बंडातात्या कऱ्हाडकर यांना तापकिरवाडी येथील संकल्प मंगल कार्यालयातून दिघी आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शनिवारी सकाळी नऊ वाजता ताब्यात घेऊन त्यांना आळंदीहून कऱ्हाडला आणण्यात आले. कऱ्हाड पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर बंडातात्या कऱ्हाडकर यांना करवडी येथील गोपालन केंद्रात स्थानबद्ध करून ठेवले आहे. कऱ्हाड पोलिसांच्यावतीने येथे पहारा ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देबंडातात्या कऱ्हाडकर यांना करवडीतील गोपालन केंद्रात स्थानबद्ध

ओगलेवाडी : पंढरपूरच्या पायी वारीसाठी आग्रही असलेले आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अग्रणी बंडातात्या कऱ्हाडकर यांना तापकिरवाडी येथील संकल्प मंगल कार्यालयातून दिघी आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शनिवारी सकाळी नऊ वाजता ताब्यात घेऊन त्यांना आळंदीहून कऱ्हाडला आणण्यात आले. कऱ्हाड पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर बंडातात्या कऱ्हाडकर यांना करवडी येथील गोपालन केंद्रात स्थानबद्ध करून ठेवले आहे. कऱ्हाड पोलिसांच्यावतीने येथे पहारा ठेवण्यात आला आहे.पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढीवारी सध्या सुरू झाली आहे. ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांचे पालखी देहू व आळंदीतून प्रस्थान करीत आहेत. मागील वर्षी आणि यावर्षीही महाराष्ट्र सरकारने पायी वारी न काढता बसमधून मर्यादित वारकऱ्यांच्या वारीस परवानगी दिली आहे. मात्र पायी वारी ही वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. बंडातात्या कऱ्हाडकर यांनीही शासनाकडे पायी वारीची मागणी केली.

कमीत कमी वारकऱ्यांसह पायी वारीसाठी ते आग्रही होते. मात्र पायी वारी सुरू झाल्यानंतर होणारी गर्दी आणि वाढता कोरोना संसर्ग यामुळे दिघी पोलिसांनी कऱ्हाडकर यांना सकाळी नऊ वाजता ताब्यात घेतले. दुपारी एक वाजता कऱ्हाड पोलिसांच्या ताब्यात दिले. कऱ्हाड शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील आणि पोलीस उपअधिक्षक रणजीत पाटील यांनी त्याचे मागणीनुसार त्यांना येथील गोपालन केंद्रात आणून ठेवले आहे.कऱ्हाड ग्रामीण पोलीस येथे पहारा देत आहेत. तात्यांना या ठिकाणी आणल्याचे समजताच परिसरातील त्याचे अनुयायी येथे जमा झाले आहेत. बंडातात्या कराडकर यांनी अनुयायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर