शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: गर्भपात करणाऱ्या माळशिरसच्या डॉक्टरचा जामीन फेटाळला, फलटणचे डॉ. संतोष निंबाळकर अद्यापही फरारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 12:02 IST

तातडीने अटकेची कारवाई होणे गरजेचे

सातारा : फलटण तालुक्यातील पिंप्रद या गावाजवळील उसाच्या फडात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. विकास काळे (वय ४०, रा. पुणे-पंढरपूर रोड, साठ फाटा, माळशिरस, जि. सोलापूर) यांचा वाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, याच प्रकरणातील फलटणचे डाॅ. संतोष निंबाळकर हेसुद्धा अद्याप फरारच आहेत.पिंप्रद या गावाजवळील उसाच्या फडात गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले. या प्रकरणानंतर वाई पोलिसांनी या फडात गर्भलिंग निदान चाचणीसाठी गेलेल्या महिलेसह तिचा नातेवाईक आणि एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला. वाई पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक फाैजदार विजय शिर्के यांनी तसेच त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.

फलटण तालुक्यातील राजाळे येथील डाॅ. संतोष निंबाळकर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील डाॅ. विकास काळे यांची नावे समोर आली. त्यानंतर डाॅ. विकास काळे यांनी वाई न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी डाॅ. काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच या प्रकरणातील संशयित महिलेनेही न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तिचाही अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

तातडीने अटकेची कारवाई होणे गरजेचेडाॅ. संतोष निंबाळकर आणि डाॅ. विकास काळे हे गेल्या काही महिन्यांपासून गायब आहेत. वाई पोलिसांनी अद्यापही त्यांना अटक केली नाही. हे प्रकरण गंभीर असताना केवळ ते फरार आहेत, असे पोलिसांकडून सांगितलं जातंय. कोणत्याही कोनाड्यात लपून बसलेल्या आरोपींना शोधून काढणे पोलिसांना सहज शक्य आहे. असे असताना या दोन डाॅक्टरांबाबत अटकेच्या कारवाईसाठी विलंब का केला जातोय, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे..

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAbortionगर्भपातdoctorडॉक्टरCourtन्यायालय