शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

अंबवडे-गोरेगाव पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

मायणी : येरळा नदीवर असलेला अंबवडे-गोरेगाव फरशी पूल गत दोन महिन्यांपूर्वी वाहून गेला आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर ...

मायणी : येरळा नदीवर असलेला अंबवडे-गोरेगाव फरशी पूल गत दोन महिन्यांपूर्वी वाहून गेला आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला तरीही अजून या पुलाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. पुलाच्या दुरुस्तीला मंजुरी असूनही ग्रामस्थ पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या पुलाचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

गत दोन महिन्यांमध्ये खटाव तालुक्‍याच्या दक्षिण, उत्तर भागात पाऊस पडला. या पावसामुळे खटाव तालुक्याची जलवाहिनी असलेली येरळा नदी दुतर्फा भरून वाहू लागली. या नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे नदीवर असलेला मध्यम प्रकल्प तसेच लहान-मोठे सिमेंट बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले.

येरळवाडी (ता. खटाव) याठिकाणी असलेला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीपात्रात पाण्याची आवक वाढू लागल्याने या नदीपात्रात असलेला अंबवडे-गोरेगाव तसेच मोराळे निमसोड हे दोन्ही पूल गतवर्षी वाहून गेले. तसेच या पुलावरून सुमारे एक महिन्याहून अधिक काळ पाण्याचा प्रवाह चालू होता. या पाण्याच्या प्रभावामुळे मोराळे-निमसोड मार्गावरील पुलावर २०१९ मध्ये जेवढा भाग वाहून गेला होता. तेवढाच भाग यावर्षी वाहून गेला व आता तेवढी दुरुस्ती केली.

आंबवडे-गोरेगाव मार्गावरील पूल हा जवळपास निम्मा वाहून गेला. त्यामुळे या ठिकाणीची पूर्ण वाहतूक बंद झाली. पुलाजवळच थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, आज नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह जवळजवळ बंद झाला आहे. या भागातील ग्रामस्थ नदीपात्रातून ये-जा करीत आहेत. या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

चौकट..

नदीपात्रातून ये-जा करण्यासाठी कसरत..

अद्याप पुलाची दुरुस्ती सुरू झाली नसल्याने या परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालक आजही प्रतीक्षेत आहेत. नदीच्या पात्रातून ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने यावर्षी पुलाचे लवकर बांधकाम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

०२मायणी पूल

येरळा नदीपात्रात असलेला अंबवडे-गोरेगाव पूल अशाप्रकारे वाहून गेला आहे. (छाया : संदीप कुंभार)