शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

औंधमध्ये ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत! : रुग्णांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 18:59 IST

अतिशय छोट्या खोल्यांमध्ये एकमेकांना खेटून कॉटस् टाकल्या आहेत. त्या खोल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे चांगले व्हेंटिलेशन उपलब्ध केलेले नाही. कोणत्याही खोलीत एसी सुविधा उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृहेही अपुरी आहेत. सध्या याठिकाणी दहा कॉटवरच रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे.

ठळक मुद्देनवीन वर्षात इमारतीत प्रवेश होणार का?, नागरिकांचे लक्ष राहिले लागून

औंध : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण झाले असून, जुन्या इमारतीत रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. नवीन वर्षात तरी नवीन इमारतीत स्थलांतर होणार का? याकडे औंध पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित विभागाने याबाबत तातडीने पावले उचलून रुग्णांसाठी ही नूतन इमारत खुली करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

 

ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. कारण अपुºया सोयीसुविधा जागेची कमतरता यामुळे रुग्णांना अनेक अडीअडचणी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जुन्या इमारतीमध्ये प्रचंड अडचण आहे. अतिशय छोट्या खोल्यांमध्ये एकमेकांना खेटून कॉटस् टाकल्या आहेत. त्या खोल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे चांगले व्हेंटिलेशन उपलब्ध केलेले नाही. कोणत्याही खोलीत एसी सुविधा उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृहेही अपुरी आहेत. सध्या याठिकाणी दहा कॉटवरच रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे.

औंधसह ३५ गावांतील रुग्णांची व्यवस्थित सोय होईल, अशा प्रकारची भव्य इमारत उभी राहिली आहे. या इमारतीमुळे औंधच्या वैभवात आणखी भर पडली आहे. जुन्या व नवीन इमारतीसह एकूण येथे ३० कॉटस्ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मागील वर्षी काम रखडले होते. मात्र, आता इमारतीचे मुख्य दरवाजाचे, रंगरंगोटीचे, खिडक्यांचे त्याचबरोबर इतर अंतर्गत इंटिरियरचे पूर्ण झाले आहे. या इमारतीत रुग्णालय रुग्णांच्या दृष्टीने यामुळे चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत पंचक्रोशीतील नागरिक असून, हे उद्घाटन रखडल्याने आतमध्ये पक्षी व प्राण्यांनी घाण करून टाकली आहे. नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यास औंध भागातील रुग्णांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.पावसाळ्यात झाला प्रचंड त्रास..ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत अपुरी आहे. औंध परिसरातील येणाºया रुग्णांची संख्या पाहता लवकरच नवीन इमारतीत जाण्याची गरज आहे. पावसाळ्यात रुग्णासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

आमची हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. किरकोळ कामे, साफसफाई करून लवकरच नवीन इमारत हस्तांतर होईल. जास्त कालावधी जाणार नाही. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.-एस. व्ही. पवार, शाखा अभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग औंध

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMedicalवैद्यकीय