शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

औंध संगीत महोत्सव आॅनलाइन पद्धतीने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 13:21 IST

Coroanavirus, music, sataranews, audndh अश्विन वद्य पंचमीला शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान (डोंबिवली) संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा औंध संगीत महोत्सव यंदा कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने २२ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यंदा या महोत्सवाचे ८० वे वर्ष आहे.

ठळक मुद्देऔंध संगीत महोत्सव आॅनलाइन पद्धतीने ! कोरोना कारण : २० नोव्हेंबर रोजी आयोजन

औंध : अश्विन वद्य पंचमीला शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान (डोंबिवली) संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा औंधसंगीत महोत्सव यंदा कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने २२ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यंदा या महोत्सवाचे ८० वे वर्ष आहे.ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अनंतबुवा जोशी यांनी त्यांचे अध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औंध येथे १९४० पासून हा उत्सव सुरू केला. सुरुवातीला छोटेखानी स्वरूप असलेल्या या उत्सवाचे स्वरूप हळूहळू वाढत गेले. पं. अंतुबुवा यांचे पुत्र प्रख्यात गायक व व्हायोलिन वादक पं. गजाननबुवा जोशी यांनी १९८१ साली शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून हा महोत्सव शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आयोजित केला जातो.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पहिले सत्र सुरू होईल. या सत्राची सुरुवात युवा कलाकार यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने होईल. त्यांना तबला साथ विश्वनाथ शिरोडकर करणार आहेत. यानंतर विश्वनाथ जोशी यांचे एकल तबला वादन सादर होणार आहे. त्यांना लेहरा साथ सिद्धेश बिचोलकर देणार आहेत. प्रथम सत्राची सांगता विश्वेश सरदेशपांडे यांच्या गायनाने होईल. त्यांना संवादिनी साथ सौमित्र क्षीरसागर यांची तर तबला साथ पुष्कर महाजन यांची असणार आहे.द्वितीय सत्राची सुरुवात सायंकाळी ६ वाजता सावनी शेंडे यांच्या गायनाने होईल. त्यांना संवादिनी साथ सुयोग कुंडलकर करणार आहेत. तर तबला साथ चारुदत्त फडके यांची आहे. यंदाच्या औंध संगीत महोत्सवाची सांगता हेमंत पेंडसे यांच्या गायनाने होईल. त्यांनाही संवादिनी साथ सुयोग कुंडलकर करतील, तर तबला साथ प्रणव गुरव करणार आहेत.

टॅग्स :musicसंगीतAundhऔंधSatara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या