शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election: जुळेवाडीत अतुल भोसलेंच्याच नव्या जुन्या कार्यकर्त्यांचे जुळेना!, समर्थकांचीच पॅनेल आमने-सामने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 11:59 IST

सरपंचपदच बनले कळीचा मुद्दा

प्रमोद सुकरेकराड : जुळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत निवडणूक १८ डिसेंबर रोजी होत आहे. त्यासाठी दोन पॅनेल एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. पण दोन्ही पॅनेलचे समर्थक भाजपचे युवा नेते डॉ. अतुल भोसले यांना मानणारेच असल्याने त्यांच्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांचे जुळले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.एकेकाळी रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीचाच एक भाग म्हणून जुळेवाडीची ओळख होती. पण सन १९९२ साली जुळेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. त्यावेळी पासून डॉ. भोसले गटाचीच सत्ता या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. शंकर काशीद हे या गावचे पहिले सरपंच राहिले आहेत. त्यानंतर सन १९९७ ते आज अखेर  डी.एस.सोमदे यांच्या नेतृत्वाखाली या गावचा कारभार चालला होता. त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक होत आहे.जुळवडीची लोकसंख्या चार ते साडेचार हजाराच्या आसपास आहे. कृष्णा काठचे एक समृद्ध गाव म्हणून या गावाची ओळख आहे. लोकसंख्येच्या नुसार येथे ११ ग्रामपंचायत सदस्य व थेट जनतेतून सरपंच  अशी निवडणूक होत आहे.सहकारमहर्षी जयवंतराव भोसले ग्रामविकास सहकार पॅनेल च्या वतीने नितीन वसंत बाकले हे सरपंचपदाचे उमेदवार आहेत. विकास सोसायटीचे अध्यक्ष सुनील बाकले, सतीश सोमदे आदी मंडळी या पॅनेलसाठी झटत आहेत. तर सहकारमहर्षी जवंतराव भोसले ग्रामविकास पँनेलचे अधिकराव सोमदे सरपंच पदाची निवडणूक लढवीत आहेत. डॉ. प्रकाश सोमदे, महादेव सोमदे आदी मंडळी त्यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत.आता या निवडणुकीत निकालानंतर गुलाल भोसलेंवरच पडणार हे निश्चित आहे; पण स्थानिक नेमका कोणता गट निकालात बाजी मारणार ?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.पण त्यासाठी थोडे थांबावेच लागेल.

सरपंचपदच बनले कळीचा मुद्दाजुळेवाडी ग्रामपंचायतीत यंदा सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आणि थेट जनतेतून होत आहे. त्यामुळेच सरपंचपदाची महत्वकांक्षा आनेकांच्यात  जागृत झाली. त्यामुळे बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठीचे प्रयत्न कामी आले नाहीत. परिणामी दोन पॅनेलचे २ आणि अपक्ष २ असा सरपंच पदासाठी चौरंगी सामना पाहायला मिळत आहे.

एकजण बिनविरोधजुळवाडीची ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठी गावातील काही प्रमुख मंडळींनी प्रयत्न केले. मात्र त्याला तितके यश आले नाही .पण विश्वासराव जगदाळे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.

दोन्ही पॅनेलला जयवंतराव भोसले यांचेच नावया निवडणुकीसाठी डॉ. अतुल भोसले समर्थकांचीच दोन पॅनेल आमने-सामने उभी ठाकली आहेत. विशेष म्हणजे दोन्ही पॅनेलला दिवंगत जयवंतराव भोसले यांचेच नाव आहे.अन फलकावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ.सुरेश भोसले, विनायक भोसले यांच्या छबी दिसत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक