शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

निवडणुकीतील युतीकडे सर्वांचे लक्ष

By admin | Updated: September 24, 2016 00:20 IST

अनेकांचे देव पाण्यात : पाटणमध्ये मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात

अरुण पवार ल्ल पाटण पाटण ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यामुळे होणाऱ्या निवडणुकीसाठी अनेकांचे देव पाण्यात असून, मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. एका बाजूला सत्ताधीश म्हणून पाटणकर गट उभा आहे. त्यांच्यासमोर कडवे आव्हान देण्यासाठी इतरांची महायुती होण्याची शक्यता आहे. देसाई गट, भाजपा, मनसे, शिवसेना व पाटणमधील काही गट यांनी आपापली भूमिका बोलून दाखविली आहे. प्रभाग १७ आणि उमेदवारही तितकेच आहेत. मात्र एका प्रभागात सुमारे ७०० मतदार त्यामुळे ज्या प्रभागात ज्याचा प्रभाव तोच उमेदवार नगरसेवक होणार आहे. तरीसुद्धा राजकीय नेत्यांची व पक्षांची ताकदसुद्धा महत्त्वाची आहे. पाटणच्या बाबतीत एकूण १७ प्रभागांमध्ये माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, सत्यजित पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाची छाप आहे. तरीसुद्धा आमदारकीच्या निवडणुकीत आमदार शंभूराज देसाई यांना मतदान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. याचा विचार करूनच आमदार देसार्इंनी पाटण नगरपंचायत निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. मात्र, ‘पाटणकर विरोधी इतरांनी एकत्र आल्यास निश्चित यश मिळेल,’ अशी आ. देसार्इंची इच्छा आहे. मनसे व इतर पक्ष देखील निवडणूक लढविणार आहेत. माजी आमदार पाटणकर यांची आत्तापर्यंतची पाटण शहरातील पकड कायम असल्याचे पाटण ग्रामपंचायत निवडणुकांमधून दिसले आहे. त्यामुळे पाटणकर गटाला इतर पक्ष व गटतटांशी हातमिळविणी करण्याची सध्याची गरज वाटत नाही. नगरपंचायत निवडणूक हेच एकमेव लक्ष पाटण तालुक्यात देसाई-पाटणकर गट हे प्रमुख राजकीय दावेदार आहेत. सद्य:स्थितीत आमदार शंभूराज देसार्इंमुळे त्यांचा गट नेहमीच उत्साही दिसत आहे. दुसरीकडे पाटणकर गटात शांतता असल्याचे बोलले जाते. नेते कोणतीही भूमिका घेताना दिसत नाहीत. तरीसुद्धा नुकत्याच सार्वजनिक गणेश मंडळांना सत्यजित पाटणकर यांनी दिलेल्या भेटी व आगामी पाटण नगरपंचायत निवडणूक यामुळे पाटणकर गट आपोआपच चार्ज होणार हे निश्चित आहे. आता सर्वांसमोर नगरपंचायत निवडणूक हेच लक्ष आहे. देसार्इंना हीच वेळ योग्य... पाटण शहरात जवळपास १२ हजार मतदान आहे. या मतदारांवर पाटणकर गटाची मदार आहे. या ठिकाणी आ. देसार्इंच्या मागे येणारा उघड गट नाही. म्हणूनच नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आ. देसार्इंना पाटण शहरामध्ये शिरकाव करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे पाटणमधील कार्यकर्त्यांच्या वारंवार बैठका सुरू आहेत.