सहा महिन्यांपासून सुरू आहे चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:37 AM2021-03-06T04:37:52+5:302021-03-06T04:37:52+5:30

आदर्की लोणी-मिरज जाणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पाईपलाईनला सहा महिन्यांपूर्वी बिबी-घाडगेवाडी गावच्या हद्दीत दहा फुटाचे भुयार पाडून पेट्रोल चोरीचा प्रयत्न अयशस्वी ...

Attempted theft has been going on for six months | सहा महिन्यांपासून सुरू आहे चोरीचा प्रयत्न

सहा महिन्यांपासून सुरू आहे चोरीचा प्रयत्न

Next

आदर्की

लोणी-मिरज जाणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पाईपलाईनला सहा महिन्यांपूर्वी बिबी-घाडगेवाडी गावच्या हद्दीत दहा फुटाचे भुयार पाडून पेट्रोल चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर पुन्हा फक्त दोन कि. मी. अंतरावर पाईपला होल पाडून समांतर पाईप टाकून चोरीचा प्रयत्न झाल्याने यामागे आंतरराष्ट्रीय टोळीबरोबर अन्य काहीजणांचे सहकार्य असल्याची शंका व्यक्त होत आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे लोणी ते मिरजपर्यंत पेट्रोल पाईपलाईन टाकण्याचे काम १५ वर्षांपूर्वी झाले. त्यावेळी जलदगतीने काम करताना पाईपलाईन जमिनीत पाच ते सात फुटांपर्यंत खोल गाडली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. पण, जमिनीच्या मध्यभागातून पाईप गेल्याने शेतकरी मशागत करून पिकांची पेरणी करतात. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेऊन (सासवड, झणझणे, ता. फलटण) येथे पाईपलाईनला होल पाडून समांतर पाईपलाईन टाकून चोरीचा प्रयत्न केला. परंतु व्हॉल्व्हला गळती लागून पेट्रोल जमिनीत मुरुन विहिरीत उतरल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. हजारो लिटर पेट्रोल शेतात वाहून विहिरीत उतरले. त्यामुळे पाणी दूषित होऊन जलचर प्राणी विहिरीत मृत्युमुखी पडल्याने मासे, बेडकांचा खच पडला आहे. त्यामुळे शेतकरी, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. याच पेट्रोल पाईपलाईनला बिबी गावच्या हद्दीत पाझर तलावाखाली वेड्या बाभळीच्या बुंध्याखालून अंदाजे १० ते १५ फूट भुयार खोदकाम करून पाईपलाईन फोडण्याचा प्रकार अगोदरच उघड झाल्याने चोरीचा प्रकार झाला नाही, अशी नोंद लोणंद पोलीस स्टेशनला झाली आहे.

चौकट

पाईपलाईनला होल पाडूनही कंपनीला पत्ताच नाही

पेट्रोल पाईपलाईनशेजारी खुदाई किंवा पाईपलाईन शेजारच्या झाडाच्या फांद्या तोडल्या तरी अलार्म वाजतो व संबंधित ठिकाणी यंत्रणा पोहोचते. मग पाईपलाईनला होल पाडून समांतर पाईप टाकली, तीही जमिनीखाली चार ते पाच फूट खोल; मग अलार्म का वाजला नाही, याचा शोध घेतला पाहिजे.

फोटो -२

चौकट

सहा महिन्यांत दोनवेळा चोरीचा प्रयत्न

या पाईपलाईनमधून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न दोनवेळा झाला आहे. तरीदेखील दोन्ही वेळेस पोलीस स्टेशनला अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. मात्र, त्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली नाही. यापूर्वीच ही माहिती मिळाली असती, तर दुसरा प्रयत्न झाला नसता.

Web Title: Attempted theft has been going on for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.