शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

वडाप जीपला चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी दहा फूट खड्ड्यात, सहाजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 16:29 IST

धोकादायक वळण अन् दाट झाडीमुळे एसटी न दिसल्याने भरधाव आलेल्या वडाप जीपने एसटीला जोदार जोरदार धडक दिली. यामध्ये वडापमधील सहाजण जखमी झाले असून, त्यामध्ये जीप चालकाचाही समावेश आहे. अपघातावेळी वडाप जीपला चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी पुलाच्या पुढील बाजूला असलेल्या दहा फूट खड्ड्यात जाऊन उलटली. हा अपघात सोमवारी सकाळी सव्वासात वाजता झाला.

ठळक मुद्देडापमधील चार प्रवासी जखमी सातारा-रहिमतपूर मार्गावरील जैतापूरजवळ दुर्घटनाफुटलेल्या काचेतून प्रवासी बाहेर

सातारा ,दि. ३० : धोकादायक वळण अन् दाट झाडीमुळे एसटी न दिसल्याने भरधाव आलेल्या वडाप जीपने एसटीला जोदार जोरदार धडक दिली. यामध्ये वडापमधील सहाजण जखमी झाले असून, त्यामध्ये जीप चालकाचाही समावेश आहे. अपघातावेळी वडाप जीपला चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी पुलाच्या पुढील बाजूला असलेल्या दहा फूट खड्ड्यात जाऊन उलटली. हा अपघात सोमवारी सकाळी सव्वासात वाजता झाला.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगाराची सातारा-वडूज (एमएच १२ एक्यू ६९५०) पाच प्रवासी घेऊन वडूजच्या दिशेन निघाली होती.

ही बस जैतापूर हद्दीत आली असता. एका पुलावरील दाट झाडी अन् धोकादायक वळणामुळे रहिमतपूरकडून येत असलेल्या वडाप चालकाला एसटी दिसली नाही. त्याने एसटीला जोरदार धडक दिली.

या अपघातात जीपचालक रवींद्र श्रीरंग मतकर (वय ३५), यशवंत रामचंद्र साखरे (वय ६७, दोघेही रा. तांदुळवाडी, ता. कोरेगाव), बाबूराव रोहिदास जाधव (वय ७२), मंदा लक्ष्मण साळोखे (वय ३८), सुवर्णा लक्ष्मण गवळी (वय ३०, तिघेही रा. चिंचणेर निंब, ता. सातारा) आणि सुरेश रामचंद्र कदम (वय ५०, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) हे सहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुगालयात उपचार सुरू आहेत. सातारा तालुका पोलिस अपघातग्रस्तांकडून माहिती घेत आहेत. 

 

फुटलेल्या काचेतून प्रवासी बाहेरएसटी बस रस्ता सोडून दहा फूट खोल खड्ड्यात गेली. या ठिकाणी असलेल्या झाडीमुळे ती अडकल्यामुळे अनर्थ टळला. परंतु एसटीतील पाच प्रवासी अन् चालक-वाहक एसटीतच अडकले होते. खड्ड्यात जाऊन उलटली गेली. वाहकाची बाजू बंद झाल्याने चालकासमोरील फुटलेल्या काचेतून प्रवासी अन् चालक-वाहक बाहेर पडले. 

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटल