शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दोन वर्षीय मुलीवर अत्याचार, सतरा वर्षाचा युवक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:55 IST

सातारा शहर परिसरातील एका उपगनरामध्ये दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात दोन वर्षीय मुलीवर अत्याचार, सतरा वर्षाचा युवक ताब्यातगळफास घेऊन एकाची आत्महत्या

सातारा : शहर परिसरातील एका उपगनरामध्ये दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित मुलीला तिच्या मावशीने एका ढाब्यावर नेले होते. तेथे मावशीचे काम सुरू असताना मुलगी खेळत होती. काम संपल्यानंतर ती मावशीसोबत घरी आली. यावेळी मुलीची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे तिच्या नात्यातील दोन महिलांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता संबंधित पीडित मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी माहिती घेऊन संशयिताचा शोध घेण्यास सुरूवात केली. एका सतरा वर्षीय युवकाने या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना समजली. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले. तोही अल्पवयीन असल्यामुळे त्याला रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे.गळफास घेऊन एकाची आत्महत्या कण्हेर,ता. सातारा येथील संतोष भानुदास वाघमळे (वय ४२) यांनी गुरुवारी दुपारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष वाघमळे हे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. त्यांना दारूचे व्यसनही होते. त्यांची पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी राहत आहे.

दरम्यान, गुरुवारी दुपारी त्यांनी कण्हेरपासून जवळच असलेल्या एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती त्यांचा चुलत भाऊ सागर वाघमळे याला मिळाली. त्यानंतर त्याने सातारा तालुका पोलिसांना याची माहिती दिली. संतोष वाघमळे यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर