शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 15:52 IST

नात्याला काळीमा फासणारी घटना साताऱ्यात घडली असून वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अखेर वडिलांच्या गैरकृत्याला कंटाळून मुलीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

ठळक मुद्देसाताऱ्यात वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचारवडाप जीपचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

सातारा : नात्याला काळीमा फासणारी घटना साताऱ्यात घडली असून वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अखेर वडिलांच्या गैरकृत्याला कंटाळून मुलीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी साडेचौदा वर्षाची आहे तर तिचा वडील ३६ वर्षाचा आहे. संबंधित कुटुंबामध्ये मुलीची आई असून ती धुणी-भांडीचे काम करते. मुलीच्या वडिलांना दारुचे व्यसन असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दि. १८ ते २७ एप्रिलपर्यंत वारंवार मुलीसोबत वडिलाने गैरकृत केले.

मुलगी घरात एकटी असताना वडील मुलीशी घृणास्पद प्रकार करत होता. या घटनेनंतर मुलगी घाबरुन जायची. या कृत्याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची वडील धमकी देत होते. अखेर घडलेल्या घटनेबाबत मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी मुलीला सोबत घेऊन शहर पोलीस ठाणे गाठले.पीडित मुलीने पोलिसांना घटना सांगितल्यांतर पोलीसही हादरुन गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ संशयित पित्याविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.त्यानंतर पित्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फौजदार नानासाहेब कदम हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

वडाप जीपचालकाची गळफास घेऊन आत्महत्या वडाप जीपचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजता दौलतनगर (करंजे सातारा) येथे घडली. पंकज नारायण इंगुळकर (वय ४१) असे आत्महत्या केलेल्या वडाप जीपचालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पंकज इंगुळकर हे सातारा ते नागठाणे असे स्वत:च्या जीपमधून वडाप करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते.

रविवारी रात्री घरी दौलतनगर येथील घरी आल्यानंतर त्यांनी घरातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी इंगुळकर यांना सिव्हिलमध्ये आणले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासले असता ते मृत असल्याचे त्यांनी घोषीत केले. इंगुळकर यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नसून पोलीस घरातल्यांकडे चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर