कोपर्डे हवेली : येथील आत्माराम श्रीपती चव्हाण (वय ७९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०२आत्माराम चव्हाण
कलावती पाटील यांचे निधन
मलकापूर : चचेगांव (ता. कऱ्हाड) येथील कलावती उत्तम पाटील (वय ६५) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. पंचायत समिती सदस्य उत्तम दत्तू पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दीर, पुतणे, भाचे असा परिवार आहे.
फोटो : ०२कलावती पाटील
सुरेश जांभळे यांचे निधन
कऱ्हाड : येथील सुरेश विश्वनाथ जांभळे (वय ६९) यांचे निधन झाले. कऱ्हाड रोटरी क्लबचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०२सुरेश जांभळे
दिनकर थोरात यांचे निधन
कऱ्हाड : विंग (ता. कऱ्हाड) येथील दिनकर पांडुरंग थोरात (वय ७९) यांचे निधन झाले. ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०२दिनकर थोरात
चंद्रकांत वाईकर यांचे निधन
कोयनानगर : मारुल तर्फ पाटण (ता. पाटण) येथील चंद्रकांत ऊर्फ अण्णा पांडुरंग वाईकर (वय ९०) यांचे सोमवारी निधन झाले. ते गृहरक्षक दलातील सेवानिवृत्त अधिकारी होते. सरपंच सुदर्शन वाईकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पाच मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०२चंद्रकांत वाईकर