शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: अथणी-रयत कारखान्याची यंदाही ऊस दरात आघाडी, एकरकमी जाहीर केला 'इतका' दर

By प्रमोद सुकरे | Updated: October 25, 2022 14:46 IST

कराड : शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स लि, रयत युनिटकडे चालू गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये गळीतास ...

कराड : शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स लि, रयत युनिटकडे चालू गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रति मेट्रिक टन २९२५/- रुपये प्रमाणे एकरकमी ऊस बिल देणार असल्याची माहीती अथणी शुगर्स चे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील यांनी दिली.अथणी शुगर्स लिमिटेड रयत युनिट, शेवाळेवाडी या युनिट चा २०२२-२३ हंगामाच्या मोळी पुजनाचा समारंभ रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड. उदयसिंह पाटील व अथणी शुगर्सचे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला, त्यावेळी लवकरच यावर्षीच्या ऊस दराबाबत घोषणा केली जाईल अशी माहिती दिली होती त्याप्रमाणे ऊस दराची एकरक्कमी घोषणा करत यंदाही सातारा जिल्ह्यात सर्व प्रथम अथणी रयतनेच आघाडी  घेतली.अथणी शुगर्सच्या रयत युनिटने गत हंगामात ५,३६,५७९ मेट्रिक टन गाळप केले आहे. सरासरी १२.३० साखर उतारा राखत ६,६४,७२० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले असून गाळप केलेल्या ऊसाचे प्रति मे.टन रू. २९२५/- प्रमाणे एक रक्कमी ऊस बिल संबंधित शेतकन्यांच्या बँक खात्यावर वेळेवर वर्ग केले होते. सदर हंगामात कारखान्याने एफआरपी पेक्षा प्रति मेट्रिक टन १४० रूपये जादा दर दिला आहे.शेतकन्यांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास व शेतकन्यांचे हित विचारात घेवून चालू गळीत हंगामात देखील गाळपास येणाऱ्या ऊसाचे एकरकमी प्रति मेट्रिक टन  २९२५/- प्रमाणे ऊस बिल देण्याचा निर्णय अथणी शुगर्स व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच प्रतिवर्षा प्रमाणेच चालू गळीत हंगामात देखील ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टनास एक किलो साखर सवलतीच्या दराने वाटप केले जाणार असून त्यामधूनही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तरी सन २०२२-२३ करीता निश्चित केलेले ५,५०,००० मेट्रिक टन गळीताचे उदिष्ट पुर्ण करणेसाठी ऊस उत्पादकांनी आपला जास्तीत जास्त ऊस अथणी शुगर्स लि. (रयत युनिट) या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन  श्रीनिवास पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने