शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सचिन-लक्ष्याची बैलजोडी ठरली ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’; शर्यत शौकिनांची रेकॉर्डब्रेक गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:24 IST

सेवागिरी यात्रा : विक्रमी ११०१ गाड्या धावल्या

पुसेगाव : महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील लाखो बैलगाडी शर्यत शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री सेवागिरी यात्रोत्सवानिमित आयोजित ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’ बैलगाडी शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यामध्ये शाहीदभाई मुलाणी, नातेपुते यांचा आदत किंग सचिन आणि आंबेगाव सांगलीच्या श्रीनाथ ज्वेलर्सचा लक्ष्या या बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचे २ लाख ७८ रुपयांचे रोख बक्षीस जिंकून ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’चा किताब पटकावला.येथील दहिवडी रोड बैल बाजाराजवळील मैदानात सकाळी साडेसहा वाजता मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या उपस्थितीत मानाचा नारळ फोडून पहिला फेरा सुरू झाला.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो बैलगाडी शर्यत शौकिनांच्या उपस्थितीत शासनाच्या सर्व नियम व अटींच्या अधीन राहून पार पडलेल्या शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ही तीन राउंड बैलगाडी शर्यत होती. शर्यतीला सुमारे १२०० गाड्यांची विक्रमी नोंद होऊन गटाचे १११ फेरे व सेमीफायनलच्या १० फेऱ्या झाल्या. अंतिम फेरीत पाच गाड्या लॉबी टच झाल्याने त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.या शर्यतीत अनुक्रमे भद्रा मारुती प्रसन्न संभाजीनगर यांचा लखन आणि कै. पंढरीनाथ फडके यांचा सर्जा, जय हनुमान प्रसन्न देवीखिंडीचा बावरा आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर, गोपीनाथ शेठ कर्जत गोविंदा आणि वसंत चव्हाण जालना यांचा बलमा, खानविलकर कळंबोली आणि अरविंद सामठाणे सिन्नर यांची बैलजोडी, तुषार पैलवान म्हसुर्णे यांचा शंभू आणि बाजीराव पाटील यांचा सोन्या, स्व. किशोर पाटील यांचा रामा आणि कुमठे येथील दत्तात्रय जगदाळे यांच्या बैलजोडीने यश मिळविले.मैदानात एकापेक्षा एक वरचढ जातिवंत खिल्लार आणि म्हैसूर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांच्या शर्यतीचा थरार प्रेक्षकांना अनुभवायास मिळाला. स्पर्धेतील प्रत्येक फेरा चुरशीचा होऊन स्पर्धा उत्कंठावर्धक झाली. अचूक निकाल पाहण्यासाठी ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेरे तैनात करण्यात आले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Sachin-Lakshya pair wins SevaGiri HindKesari; record crowd at race.

Web Summary : Sachin-Lakshya pair won the 'Shri Sevagiri HindKesari' title with a ₹2.78 lakh prize at the Shri Sevagiri Yatra festival bullock cart race. The event saw a record turnout, with 1200 bullock carts participating in the competition held under government regulations.