शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचे शिल्प उभे करा, सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांची मागणी 

By दीपक देशमुख | Updated: November 21, 2023 16:22 IST

सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा

सातारा : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान वधाच्या जागेजवळ अफजलखान वधाचे तथा शिवप्रतापाचे शिल्प उभा करून ही जागा जनतेला पाहण्यासाठी ताबडतोब खुली करावी, अशी मागणी सांगली येथील शिवसेनेचे माजी आमदार व शिवप्रताप भुमि मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक नितीन शिदे यांनी केली. नितीन शिंदे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेवून शिवप्रतापाचे शिल्पाबाबत चर्चा केली तसेच निवेदन दिले. यावेळी शिवप्रताप भुमि मुक्ती आंदोलनाचे पदाधिकारीही उपस्थित होते.याबाबत निवेदनात म्हटल आहे की, शिंदे-फडणवीस सरकारने दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी वनखात्याच्या जागेवर अफजलखान वधाच्या जागेभोवती मोठ्या प्रमाणात केलेले बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण जमीनदोस्त केले. या जागेसमोर अफझलखान वधाचे भव्य शिल्प उभा करून ही जागा जनतेला पाहण्यासाठी खुली करावी.परिसराचे नाव श्रीशिवप्रताप भूमी असे करावे. शिल्पाजवळ मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये अफजलखान वधाचा इतिहास लिहावा, असे निवेदन देण्यात आले होते. त्यावर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी श्रीशिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन व इतर संघटनांची मागणी लक्षात घेऊन अफजलखानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साऊंड शो सुरू करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागववले. त्यावर जे. जे. आर्टस ऑफ कॉलेज, मुंबई यांच्याकडून पुतळा बनवण्यासाठी निविदाही मागविल्या.यानंतर मंजूर निविदाधारकाकडून पुतळ्याचे काम जवळपास आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान वधाच्या जागेसमोरील उंच टेकड असलेल्या जागेवर अफजलखान वधाचे भव्य शिल्प उभा करावे व ही जागा जनतेला पाहण्यासाठी खुली करावी.अफजलखान वधाच्या जागेभोवती मोठ्या प्रमाणात केलेले बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण जमीनदोस्त होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरीही ती जागा अद्याप जनतेला पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली नाही. ती जागा जनतेसाठी ताबडतोब खुली करावी, अशी मागणी यावेळी शिंदे यांनी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा पाठपुरावा राज्य शासनाकडे सुरू असल्याचे सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPratapgad Fortप्रतापगड किल्ला