शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तासवडे टोलनाका येथे स्थानिकांच्या कडून टोल घ्याल तर खळखट्याक आंदोलन; मनसेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 12:36 IST

तासवडे टोलनाका येथे नवीन आलेल्या टोलनाका व्यवस्थापनाकडून स्थानिकांकडून मासिक पासद्वारे टोलसक्ती सुरू केली आहे.

अजय जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क

उंब्रज:- तासवडे टोलनाका येथे नवीन आलेल्या टोलनाका व्यवस्थापनाकडून स्थानिकांकडून मासिक पासद्वारे टोलसक्ती सुरू केली आहे. यात स्थानिकांना टोलमधुन सुट देण्यात यावी. अन्यथा टोलव्यवस्थापनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलन करेल.असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रणजित कदम यांनी निवेदनाने टोलनाका प्रशासनाला दिला आहे.

या निवेदनानुसार,तासवडे टोलनाक्याचे व्यवस्थापन बदलल्यानंतर स्थानिकाकडून घेण्यात येत असलेला टोल हा अन्यायकारक आहे.  की एम. एच. ५० पासींगची वाहने तसेच स्थानिक वाहनधारकांना टोलमधुन मुक्त करण्यात यावे. कराड हे तालुक्याचे ठिकाण असुन उंब्रजसह परिसरातील स्थानिकांना कराड येथे शासकिय कामासाठी, वैद्यकीय उपचारासाठी, व्यवसायसाठी, नोकरी निमित्त शिक्षणासाठी दररोज ये-जा करावे लागत आहे. टोलनाका सुरू झाल्यापासुन स्थानिकांना टोलमुक्ती देण्यात येत होती. मात्र नवीन व्यवस्थापकाने याबाबींचा गांर्भियाने विचार न करता स्थानिकांकडून मासिक पासद्वारे टोलसक्ती केली जात आहे. तसेच महाराष्ट्र कामगार कायद्याप्रमाणे ८०% भुमीपुत्रांना प्राधान्य असताना आपण या कायद्याचा अवमान करून परप्रांतीय व इतर जिल्हातील कामगार नियुक्त केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. तरी आपण स्थानिक भुमीपुत्रांना प्राधान्य देवून सहकार्य करावे. 

या सर्व बाबीचा टोलनाका प्रसासनाने गांभीर्याने विचार करावा.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्थानिक वाहनधारकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.तरी येणाऱ्या आठ दिवसात योग्य निर्णय घेवून मागणी मान्य करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलन करेल. होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी टोल प्रशासन जबाबदार राहील.असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रणजीत कदम,नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष अमोल कांबळे, महिलासेनेच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षी पोळ,उंब्रज शहर अध्यक्ष विजय वाणी,विजय माने,निलेश माने व कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Satara areaसातारा परिसर