शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

video:..अन् ग्रामपंचायतीच्या थेट तिसऱ्या मजल्यावरच नेला रेडा, साताऱ्यातील वडगाव हवेलीमधील शेतकऱ्याने केला अनोखा निषेध

By प्रमोद सुकरे | Updated: November 8, 2022 16:31 IST

व्हिडीओ व्हायरल झाल्याने याची सगळीकडे जोरदार चर्चा

कऱ्हाड : एखाद्या बाबीचा कोण कसा निषेध करेल हे नक्की सांगता येत नाही. वडगाव हवेली (ता. कराड) येथे तर एका शेतकऱ्याने त्याची मागणी असलेल्या ड्रेनेजच्या लिकेज काढण्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर रेडा नेला. आधी लिकेज काढा मगच रेडा खाली घेऊन जाणार अशी भूमिका त्यांने घेतल्याने सगळ्यांचीच कोंडी झाली. कशीतरी त्याची समजूत काढल्यानंतर तो रेडा घेऊन घरी गेला. पण व्हिडीओ व्हायरल झाल्याने याची चर्चा सगळीकडे जोरदार सुरू आहे.वडगाव हवेली हे तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असणारे गाव! त्याचबरोबर राजकीय दृष्टीने संवेदनशील आणि महत्त्वाची भूमिका बजावणारे गाव म्हणून या गावाकडे पाहिले जाते. या गावातील दीपक धोंडीराम जगताप यांच्या जनावरांच्या गोठ्या जवळून जाणाऱ्या ड्रेनेज लाईन मधील पाणी या गोठ्यात जनावरांच्या खाली नेहमी जात असते. त्यामुळे जनावरांचे आरोग्य धोकादायक होते. म्हणून दीपक जगताप यांनी यापूर्वी वेळोवेळी ग्रामपंचायतकडे सदरचे लिकेज काढून घेण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे लक्ष न दिल्या गेल्याने सोमवारी दीपक जगताप हे थेट रेडा घेऊन ग्रामपंचायती जवळ पोहोचले. त्यांनी चक्क तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयात जिन्यावरून तो रेडा तेथे नेला.यावेळी उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी त्यांना रेडा खाली घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र अगोदर लिकेज काढा मग खाली जातो अशी भुमिका त्यांने घेतली. माझा कोणावर विश्वास नाही असे म्हणून ते तिथेच रेडा घेऊन बसून राहिले .मग तेथील काही लोकांनी एका 'दादा' नेत्याला फोन जोडून दिला. त्यावेळी त्यांनी तुम्ही स्वतः इथे या त्याशिवाय रेडा खाली घेऊन जाणार नाही. अशी भूमिका घेतली. सरते शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाने त्याची मनधरणी केल्यानंतर तो रेडा घेऊन घरी गेला. मात्र या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

 ग्रामपंचायत प्रशासन तक्रार देण्याच्या तयारीतसंबंधित व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालयात अशा प्रकारे रेडा घेऊन येणे चुकीची बाब आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. मात्र दुपारपर्यंत तक्रार दाखल झालेली नव्हती.

🙏🏻

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतFarmerशेतकरी