शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कलाकृतींना संस्थांचाच आधार!

By admin | Updated: December 16, 2014 23:38 IST

कलाकृतींना संस्थांचाच आधार!

राजीव मुळ्ये -सातारा  -केकाळी साताऱ्यात समृद्ध असणाऱ्या सांस्कृतिक चळवळीने पुन:श्च बाळसे धरावे म्हणून ज्या मोजक्या संस्था कार्यरत आहेत, त्या वगळता निर्मिती आणि सादरीकरणाच्या दृष्टीने सांस्कृतिक विश्वात यावर्षीही विशेष भर पडली नाही. विभागीय साहित्य संमेलनाव्यतिरिक्त दोन एकांकिका स्पर्धा, दोन संस्थांनी आयोजित केलेले संगीताचे कार्यक्रम, युवक महोत्सव, ठिकठिकाणच्या नृत्य स्पर्धा, सज्जनगड आणि नटराज मंदिरातील महोत्सव आणि जिल्हा ग्रंथ महोत्सव हीच सांस्कृतिक विश्वाची सीमारेषा राहिली.साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने उत्तमोत्तम कार्यक्रमांचा नजराणा यावर्षी सातारकरांसमोर ठेवला; तथापि फार मोठा रसिकाश्रय या कार्यक्रमांना लाभला नाही. विभागीय साहित्य संमेलनाबरोबरच मराठी भाषा पंधरवड्यानिमित्तही अनेक कार्यक्रम झाले. लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमांतर्गत शाखेने शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, रवींद्र कोल्हे यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. ऐतिहासिक वास्तूंजवळ फलक उभारण्याची मोहीम शाखेने पालिकेच्या मदतीने हाती घेतली.नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने २०१४ चा प्रारंभ समर्थ करंडक एकांकिका स्पर्धांनी केला. राज्यभरातील सुमारे चाळीस संघांनी धार्मिक कलहांपासून आदिवासींमधील अपरिचित परंपरांपर्यंत अनेक विषयांची मांडणी केली. तत्पूर्वी शाहूपुरीत ध्रुव करंडक एकांकिका स्पर्धा झाल्या. एकांकिका हे प्रभावी माध्यम असले तरी संहितांचा दुष्काळ जाणवतो, हे ओळखून मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने एकांकिका लेखन स्पर्धाही घेतली.वर्षारंभी झालेल्या जिल्हा ग्रंथ महोत्सवात यावर्षी शंभर स्टॉलच्या माध्यमातून अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयांची पुस्तकविक्री झाली आणि सातारकरांनी आपले ग्रंथप्रंम व्यक्त केले. उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध असणारे दुकानही नसणाऱ्या या शहरात वाचनसंस्कृती किती मोठ्या प्रमाणावर टिकून आहे, याचाच हा पुरावा. महोत्सवात परिसंवाद, मनोरंजक आणि उद्बोधक कार्यक्रम झाले आणि कळस चढविला.संगीताच्या क्षेत्रात पंचम ग्रुपने शास्त्रीय संगीताच्या मैफली आयोजित केल्या. सेलिब्रिटींची पावले साताऱ्याकडे वळविणाऱ्या हेरंब फाउंडेशनने आशिकी-२ फेम अरिजित सिंग आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप आमंत्रित केला. गाण्यांचे रचनाकार बप्पी लहरी सादरीकरण करून गेले.