शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील साहित्य विकून दुबईला निघाला, कामगाराला विमानतळावर जेरबंद केला; सातारा पोलिसांची मुंबईत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:15 IST

नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा : महाबळेश्वर येथील एका हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने हाॅटेलमधील ९ लाखांचे साहित्य विकून तो कायमचा दुबईला स्थायिक होण्यासाठी निघाला होता. तत्पूर्वीच स्थानिक गुन्हे शाखा आणि महाबळेश्वर पोलिसांनी संयुक्त करवाई करून त्याला मुंबई विमानतळावर अटक केली. तसेच त्याच्याकडून साहित्य विकत घेणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या.हाॅटेल कामगार कांचन कालीप्रसाद बॅनर्जी (वय ५४, रा. नागरिक काॅलनी, वीरमाता जिजाईनगर मोरेगाव, नालासोपारा, वसई ईस्ट), भंगार व्यावसायिक करण दशरथ घाडगे (वय २५, रा. आंबवडे खुर्द, ता. सातारा) व गाैतम सुरेश जाधव (वय २५, रा. यशवंतनगर, सैदापूर ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.महाबळेश्वर येथील एका हाॅटेलमध्ये कांचन बॅनर्जी हा स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. पार्टनरशिपमध्ये हे हाॅटेल चालविले जात होते. सर्व मालक बाहेर राहत होते. याचा गैरफायदा घेऊन कांचन बॅनर्जी याने २५ जून २०२५ रोजी हाॅटेलमधील इलेक्ट्राॅनिक वस्तू, फर्निचर, भांडी असे तब्बल ९ लाख ९० हजारांचे साहित्य चोरून ट्रकमध्ये घालून भंगार व्यावसायिकांना विकले. त्यानंतर तो फरार झाला. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होता.६ जुलैला कांचन बॅनर्जी हा दुबई येथे कायमचा पळून जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक परितोष दातीर, अंमलदार प्रवीण कांबळे, साबीर मुल्ला, अमित माने, ओंकार यादव, सचिन ससाणे, रवी वर्णेकर, नवनाथ शिंदे यांच्या पथकाला तत्काळ मुंबई येथे रवाना केले. हे पथक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होऊन त्यांनी तातडीने आरोपीला अटक केली.

विमानतळावरील चेक लाइनच्या रांगेत..विमानतळावर कांचन बॅनर्जी हा चेक लाइनमध्ये उभा होता. तेथेच सातारा पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने हाॅटेलचे साहित्य साताऱ्यातील भंगार व्यावसायिकांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघा संशयितांनाही अटक केली. त्यांच्या गोडावूनमधून चोरी केलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले. ज्या ट्रक व टेम्पोमधून साहित्य नेण्यात आले ती वाहनेही पोलिसांनी हस्तगत केली.

दुबईत ‘तो’ होणार होता स्थायिक..कांचन बॅनर्जी हा अविवाहित आहे. त्याच्या कुटुंबात कोणीच नाही. तो एकटाच असल्यामुळे त्याचा दुबईला कायमचे स्थायिक होण्याचा बेत होता. तेथे गेल्यानंतर आपल्याला कोणी अटक करणार नाही, यासाठी त्याने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला होता, असे पोलिसांच्या तपासात समोर आले.