शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य दलातील जवानाला लुटणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:48 IST

सैन्य दलातील जवानाच्या गळ्यातील चेन हिसकावून पलायन करणाऱ्या आरोपीला तीन तासांच्या आत गजाआड करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले. ही घटना गुरूवारी रात्री दोनच्या सुमारास जरंडेश्वर नाक्यावर घडली.

ठळक मुद्देसैन्य दलातील जवानाला लुटणाऱ्यास अटकतीन तासांत गुन्हा उघड : शाहूपुरी पोलिसांची कारवाई

सातारा : सैन्य दलातील जवानाच्या गळ्यातील चेन हिसकावून पलायन करणाऱ्या आरोपीला तीन तासांच्या आत गजाआड करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले. ही घटना गुरूवारी रात्री दोनच्या सुमारास जरंडेश्वर नाक्यावर घडली.ऋतीक जितेंद्र शिंदे (वय २०, रा. मस्केवाडा, एमएसईबी कार्यालयासमोर, गोडोली, सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैन्य दलातील जवान प्रवीण अरूण भोसले (रा. अंबवडे, ता. कोरेगाव) आणि त्याचे मित्र रात्री बाहेरगावहून कारने साताऱ्यात येत होते. जरंडेश्वर नाक्यावर अचानक त्यांच्या कारचे पेट्रोल संपले. त्यामुळे सर्वजण कारमधून उतरून रस्त्यावर उभे राहिले होते. त्यावेळी वाढे फाट्याकडून दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने जवान प्रवीण भोसले याच्या गळ्यातील चेन हिसकावून पलायन केले.

या प्रकाराची माहिती भोसले याने तत्काळ शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी भोसले याच्याकडून आरोपीचे वर्णन माहित करून घेतले. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती घेतली असता ऋतीक शिंदे याने हा प्रकार केला असल्याची माहिती तपासात पुढे आली. शाहूपुरी पोलिसांनी पहाटे गोडोली येथे ऋतीक शिंदेला त्याच्या घरातून दुचाकीसह अटक केली.

शिंदे याच्यावर सातारा तालुका आणि शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, मारामारी अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी केवळ आरोपीच्या वर्णनावरून या गुन्ह्याचा छडा लावला. ऋतीक शिंदेला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस निरीक्षक मुगूट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलीस उपनिरीक्षक डी. बी. भोसले, कॉन्स्टेबल हसन तडवी, अमीत माने, अधिकराव खरमाटे, सचिन माने, स्वप्निल कुंभार, राहुल चव्हाण, राजकुमार जाधव यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर