शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

पोलिसांवर सशस्त्र हल्ला

By admin | Updated: August 29, 2015 00:45 IST

एक कर्मचारी जखमी : अट्टल दरोडेखोराचा पाठलाग करताना महिलांकडून दगडफेक; सूत्रधार फरार

शिरवळ : अट्टल दरोडेखोराच्या मागावर असलेल्या शिरवळ पोलिसांवर सुमारे पंधरा महिलांनी काठ्या-कुऱ्हाडींनी हल्ला केला. पोलिसांवर तुफान दगडफेकही करण्यात आली. या घटनेत एक पोलीस किरकोळ जखमी झाला असून, या गोंधळाचा फायदा घेत जबरी चोरीच्या गुन्ह्यात हवा असलेला मुख्य सूत्रधार फरार झाला. ही घटना खंडाळा गावच्या हद्दीत घडली आहे.खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी (ता. खंडाळा) गावाच्या हद्दीतील जबरी चोरीप्रकरणी शिरवळ पोलिसांनी दोनजणांना दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार साथीदारांसह फरार झाला होता. शिंगरे वस्ती येथे सादिक उस्मान शेख (वय २१, मूळ रा. मोहादरी, ता. चिखली, जि. बुलडाणा) हे भाड्याच्या घरात मित्रांसमवेस राहण्यास आहेत. एका खासगी कंपनीत ते नोकरी करतात. दहा आॅगस्टच्या रात्री तीनच्या दरम्यान पप्या लाल्या शिंदे (रा. सुरवडी, ता. फलटण) हा साथीदारांसमवेत आला. दरवाजा वाजवून घरात प्रवेश करीत त्याने धमकावून घरातील दोन मोबाईल, बॅगा, कपडे व रोख रक्कम असा २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. शिरवळ पोलिसांनी याप्रकरणी शरद गंगाराम चव्हाण (२०, मूळ रा. वावरहिरे, ता. माण, सध्या रा. सुरवडी, ता. फलटण) अविनाश दत्तात्रय जाधव (२१, रा. सुरवडी, ता. फलटण) यांना मोठ्या शिताफीने अटक केली होती. निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोरखनाथ बोबडे, पोलीस हवालदार रवींद्र कदम, अमोल जगदाळे, विनोद पवार यांनी ही कारवाई केल्यानंतर संशयितांना न्यायालयाने दि. २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, मुख्य सूत्रधार पप्या लाल्या शिंदे व त्याच्या साथीदारांना शोधण्यासाठी पोलिसांनी ‘कोम्बिंग आॅपरेशन राबविले. पोलिसांची चाहूल लागल्याने तो साथीदारांसमवेत फरार झाला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करताना मळा नावाच्या शिवाराजवळ १४ ते १५ महिलांनी पोलिसांवर काठ्या, कुऱ्हाडीने हल्ला केला. यात पोलीस हवालदार स्वप्निल दौंड किरकोळ जखमी झाले. दरम्यान, या गोंधळाचा फायदा घेत पप्या लाल्या शिंदे साथीदारांसह फरार झाला. जबरी चोरीची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार रवींद्र कदम तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)दीडशे गुन्ह्यांमधील ‘वाँटेड’पप्या लाल्या शिंदे जाळ््यात सापडल्यास लोणंद, खंडाळा, शिरवळ परिसरातील सुमारे दीडशे गुन्हे उघड होऊ शकतात, असे पोलिसांनी सांगितले. यात जबरी चोऱ्या आणि दरोड्यांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.दरम्यान, पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दुर्पा लाल्या शिंदे व इतर १४ ते १५ महिलांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक एस. ए. जावीर तपास करीत आहेत.