शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचे तख्त अनेक पिढ्या पाहणार, जुन्या वस्तूंचे ‘पुरातत्व’कडून जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 19:18 IST

साताऱ्याची गादी (तख्त) व मिनियर पेंटिंगचे आयुष्य आणखी पन्नास वर्षे वाढणार

सातारा : ऐतिहासिक वस्त्र, शस्त्र व वस्तूंचे दालन असलेल्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सध्या १०० ते ४०० वर्षे जुन्या वस्तू जतन करण्याचे काम पुरातत्व विभागाने हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर साताऱ्याची गादी (तख्त) व मिनियर पेंटिंगचे आयुष्य आणखी पन्नास वर्षे वाढणार आहे.या संग्रहालयातील साताऱ्याची गादी (तख्त), मिनियर पेंटिंग, तलवारी, भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखत, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, रणशिंग, जेडची मठ, बिचवा, वाघ नखे, बंदुकांचे प्रकार, संगिनी, अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान, विविध प्रकारच्या पगड्या, शेला अशा अनेक वस्तू आजही इतिहासाची साक्ष देतात.हवेतील आर्द्रता व वातावरणातील बदलामुळे साताऱ्याची गादी (तख्त) व मिनियर पेंटिंग जीर्ण होऊन खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पुरातत्व विभागाचे तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, कीर्ती जोशी, मिर्झा शाहीद, आनंद शेळके व मधुरा शेळके या तज्ज्ञांची ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन व जतन करण्याचे काम हाती घेतले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची नूतन इमारत ताब्यात मिळताच तातडीने अंतर्गत सजावटीचे काम हाती घेतले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही इमारत लवकरात लवकर पुरातत्व विभागाकडे देण्याची कार्यवाही करावी. - प्रवीण शिंदे, अभिरक्षक, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर