शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणाची मनमानी, ग्रामपंचायतीची मानहानी; पथदिव्यांसाठी खंडाळा तालुक्याला वेगळा न्याय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:00 IST

खंडाळा तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत सर्व गावांचा वीज पुरवठा सुरू असताना खंडाळा तालुक्याला वेगळा न्याय देऊन पिळवणूक केली जात असल्याने तालुका सरपंच परिषदेच्या वतीने वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सरपंच परिषदेचे अध्यक्ष गणेश पवार, उपाध्यक्ष हिरालाल घाडगे, प्रदीप होळकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी पंचायत समिती ते वीज वितरण कार्यालय असा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी महिलांना बाहेर पडणे तसेच शेतकरी वर्गाला शेतावर जाण्यासाठी अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.वास्तविक सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यात सर्व गावांचा वीज पुरवठा सुरळीतपणे चालू आहे. याबाबतची माहिती प्रत्यक्ष जाऊन आम्ही घेतली आहे. मात्र, खंडाळा तालुक्यातच वीज वितरणच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभाराचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील काही गावांनी थकीत वीज बिले भरल्याने त्यांचा वीज पुरवठा सुरू आहे.मात्र, बहुतांश गावातील ग्रामपंचायतीचे कर उत्पन्न कमी असल्याने वीज बिले भरणे शक्य झालेले नाही, तरी इतर तालुक्यात अशा पद्धतीने वीज पुरवठा सुरू असताना खंडाळा तालुक्याला वेगळा न्याय का? असा जाब विचारण्यासाठी खंडाळा तालुक्यातील सरपंच परिषदेच्या माध्यमातून विविध गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी लोकांच्या नागरी हक्कांसाठी वीज वितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यावेळी वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व गावांचा पथदिव्यांचा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची विनंती करण्यात आली.

जिल्ह्यातील इतर तालुक्यात पथदिव्यांची वीज खंडित केली नाही; मग खंडाळा तालुक्यात वेगळा नियम आहे का? अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करून लोकांना वेठीस धरले आहे. वारंवार सूचना करूनही परिस्थिती बदलली नसल्याने गावातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी मोर्चाचा मार्ग पत्करावा लागला. -हिरालाल घाडगे, उपाध्यक्ष सरपंच परिषद

टॅग्स :Satara areaसातारा परिसरelectricityवीज