शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

एप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल करुया... नेटिझन्सची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 17:17 IST

एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशू-पक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता नेटिझन्सची पुढाकार घेतला आहे.  तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षापासून एप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल करू या अशी आर्त हाक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जात आहे.

ठळक मुद्देएप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल करुया... नेटिझन्सची हाक सोशल मीडियाच्या माध्यमातून वृक्षलागवडीबाबात प्रबोधन

सातारा : एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशू-पक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता नेटिझन्सची पुढाकार घेतला आहे.  तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षापासून एप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल करू या अशी आर्त हाक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जात आहे.सोशल मीडिया हे केवळ संवादाचेच नव्हे तर जनजागृतीचेही प्रभावी माध्यम बनू पाहत आहे. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असो की आर्थिक मदत असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून जो तो आपापल्या परीने मदतीसाठी धावून येतो.

वाढत्या उष्म्याचा जसा माणसांवर परिणाम होतो तसाच परिणाम पशू-पक्ष्यांवरही होतो. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्याने पशू-पक्षी कासावीस होतात. त्यामुळे पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले. परिणामी अनेकांकडून रस्त्याच्याकडेला, झाडांवर, डोंगरांवर पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था केली गेली.सध्या तापमानवाढ ही समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बेसुमार जंगलतोड आणि वणव्यामुळे हजारो झाडे जळून खाक होत आहे. ही बाबत तापमानवाढीला कारणीभूत ठरत आहे. वाढते तापमान रोखण्यासाठी आता पुन्हा एकदा नेटिझन्सची पुढाकार घेतला आहे. तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीपर आवाहन केले जात आहे.एप्रिल महिन्यात एकमेकांना फसवून एप्रिल फूल करण्याऐवजी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षी एप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल करू या अशी आर्त हाक नेटिझन्सकडून दिली जात आहे. विशेष बाब म्हणजे सातारकरांनी या हाकेला प्रतिसाद देत वृक्ष लागवडीसाठी पुढाकारही घेतला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान