शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

साठी ओलांडलेल्या शाळेचं रुपडं पालटणार : ग्रामस्थांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:32 IST

School, educationsector, sataranews तरडगावमध्ये १९६० मध्ये बांधलेल्या हायस्कूलची इमारत जीर्ण झाली होती. त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात होते. पण इतर गावांप्रमाणेच आपलीही चांगली शाळा असावी हे स्वप्न येथील विद्यार्थ्यांनी पाहिले होते. शैक्षणिक संस्था, ग्रामस्थ व कमिन्स कंपनी यांच्या संयुक्त सहभागातून तरडगाव हायस्कूल इमारत बांधण्यात येत आहे. याचा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला.

ठळक मुद्दे साठी ओलांडलेल्या शाळेचं रुपडं पालटणार : ग्रामस्थांचा पुढाकार तरडगावमधील विद्यार्थ्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्येक्षात उतरणार

तरडगाव : तरडगावमध्ये १९६० मध्ये बांधलेल्या हायस्कूलची इमारत जीर्ण झाली होती. त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात होते. पण इतर गावांप्रमाणेच आपलीही चांगली शाळा असावी हे स्वप्न येथील विद्यार्थ्यांनी पाहिले होते. शैक्षणिक संस्था, ग्रामस्थ व कमिन्स कंपनी यांच्या संयुक्त सहभागातून तरडगाव हायस्कूल इमारत बांधण्यात येत आहे. याचा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला.पूर्वी झाडाखाली, मंदिरात शाळा भरत असत. कालांतराने शालेय इमारती उदयास येऊन त्यास खऱ्या अर्थाने ज्ञानमंदिराच रूप मिळालं. पण अनेक वर्षांनी या इमारतींची झीज होऊन आता त्यांची दुरावस्था होऊ लागली आहे. याचा प्रत्यय श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण या संस्थेच्या तरडगाव येथील वेणूताई चव्हाण हायस्कूलकडे पाहिल्यावर येतो. शाळेत शिक्षण घेऊन अनेकांनी विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वातून वेगळा ठसा उमटवित गावाला चांगला नावलौकिक मिळवून दिला आहे. १९६० मध्ये लोकसहभागातून बांधलेल्या या शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे.नूतन इमारतीबाबत अनेक वर्षे ग्रामसभामधून चर्चा होत. पण काहीच हालचाली होत नव्हत्या. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकांमधून अखेर नूतन इमारतीबाबत सकारत्मक चर्चा घडून संस्था, कमिन्स कंपनी, ग्रामस्थ यांच्या सहभागातून सुसज्ज इमारत बांधण्याचा निर्णय झाला. अन विजयादशमीच्या दिवशी भूमिपूजनही करण्यात आले.

दहावीत प्रथम आलेल्या वैष्णवी शिंदे या विद्यार्थिनीच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी संस्थेचे गव्हर्नर कौन्सिलचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी- बेडके, माजी सभापती वसंतराव गायकवाड, मालोजीराजे बँकेचे संचालक सुभाषराव गायकवाड, हृदय कदम, प्रवीण गायकवाड, विक्रम धुमाळ, मुख्याध्यापक एस. पी. पाटील, उपस्थित होते. भोसले कुटुंबाचा सत्कारशाळेच्या बांधकामासाठी थोडी जागा कमी पडत होती. हे लक्षात आल्यावर बाळासाहेब भोसले, दत्तात्रय भोसले, सुहास भोसले, दीपक भोसले यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून दान स्वरूपात दिली. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पदाधिकारी, सदस्यांची अनुपस्थितीनूतन इमारतीबाबत चर्चेसाठी यापूर्वीच्या बैठकांना उपस्थित राहिलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य हे भूमिपूजनाला मात्र अनुपस्थित राहिल्याचे दिसले.

टॅग्स :SchoolशाळाSatara areaसातारा परिसर