शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 10:58 IST

गेल्या आठवड्यात गुरुवार बागेजवळ इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.

ठळक मुद्देसाताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यूदुसऱ्यांदा घटना घडल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता

सातारा : गेल्या आठवड्यात गुरुवार बागेजवळ इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.नारायण नरोत्तम धुर्वे (वय ३९, मूळ रा. छत्तीसगड, सध्या रा. विलासपूर, सातारा) असे इमारतीवरून पडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून सदर बझार येथील कुपर कॉलनीमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

या बांधकामावर नारायण धुर्वे हे काम करत होते. शुक्रवारी दुपारी काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला. ते खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर जखम झाली. हा प्रकार घडल्यानंतर इतर कामगारांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, अशाच प्रकारची घटना गेल्या आठवड्यात साताºयातील गुरुवार बागेजवळही घडली होती. इमारतीवर काम करत असताना तोल जाऊन रवी भिकू चव्हाण (वय ३२, रा. शाहूपुरी सातारा) या कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर