शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कुछ तो गडबड है; गर्भपातासाठी पत्नी म्हणून दुसरीलाच रुग्णालयात नेलं, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 13:14 IST

साहजिकच संजय भांडवलकर याच्या पत्नीलाही ते ओळखत होते. हा प्रकार भलताच असल्याचे डॉ. विवेकानंद यांना समजल्यानंतर त्यांनी वडूज पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन दोघांना पोलीस ठाण्यात नेले.

ठळक मुद्दे वडूजमध्ये खळबळ

सातारा/ वडूज :  पती- पत्नीचे खोटे नाते कागदोपत्री तयार करून एक जोडपे गर्भपात करण्यासाठी मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास खासगी रुग्णालयात आले. यावेळी डॉक्टरांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर  वडूज पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दुसºया दिवशी मंगळवारी जोडपे रुग्णालयात येताच पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन बोगस दाम्पत्याला ताब्यात घेतले.        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,   वडूज येथील एका खासगी दवाखान्यात मंगळवार दि. ११ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भांडवलकर नावाचे जोडपे तपासणीसाठी आले. संजय भांडवलकर (रा. पाचवड ता. माण) याने त्याची पत्नी गर्भवती असून, ती शिक्षण घेत आहे. त्यामुळे आम्हाला सध्या अपत्य नको असल्याचे त्याने  डॉ. वेदिका माने यांना सांगितले. डॉ. माने यांनी संबंधित महिलेची सोनोग्राफी केली असता तीन महिन्यांचा जिवंत गर्भ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना दुसºया दिवशी बुधवारी रुग्णालयात येण्यास सांगितले. बुधवार दि. १२ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भांडवलकर दाम्पत्य रुग्णालयात पुन्हा आले.  त्यांना आधारकार्ड दाखविण्यास सांगितले. मात्र प्रत्यक्ष दिसण्यावरून व आधारकार्डवरील माहितीवरून यात तफावत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तसेच डॉ. वेदिका माने यांचे पती डॉ. विवेकानंद माने हे संजय भांडवलकर यांचा मेव्हणा राजेश सुतार यांना ओळखतात. त्यामुळे  साहजिकच संजय भांडवलकर याच्या पत्नीलाही ते ओळखत होते. हा प्रकार भलताच असल्याचे डॉ. विवेकानंद यांना समजल्यानंतर त्यांनी वडूज पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन दोघांना पोलीस ठाण्यात नेले. महिलेची प्रकृती बिघडली..पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर दोघेही पती-पत्नी नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करून भांडवलकरला टक केली. तर संबंधित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा शासकीय  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणाचा हवालदार विकास जाधव अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSatara areaसातारा परिसर