अपघातातील दुसऱ्या जखमी युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:24+5:302021-07-21T04:26:24+5:30

आगाशिवनगर परिसरात शोककळा कराड-ढेबेवाडी रस्त्यावर कणसेमळा येथील दूर्घटना लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर कणसेमळा विंग नजीक शुक्रवारी ...

Another injured youth dies in accident | अपघातातील दुसऱ्या जखमी युवकाचा मृत्यू

अपघातातील दुसऱ्या जखमी युवकाचा मृत्यू

Next

आगाशिवनगर परिसरात शोककळा

कराड-ढेबेवाडी रस्त्यावर कणसेमळा येथील दूर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर कणसेमळा विंग नजीक शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात आगाशिवनगर येथील एक युवक ठार तर तीन युवक गभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी युवकांपैकी एका युवकाचा मंगळवारी पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. एकाच कॉलनीतील दोघा मित्रांचे निधन झाल्याने आगाशिवनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

जयदीप शांताराम जाधव (वय २४, रा. गणेश कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे मंगळवारी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर निखिल सचिन कालेकर (२२), धैर्यशील प्रकाश कदम-पाटील (२५) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणेश कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर, येथील चार युवक कार (एमएच ५० ए ६३६१) मधून शुक्रवारी रात्री ढेबेवाडीच्या दिशेने जात होते. मध्यरात्रीनंतर कार कणसेमळा, विंग हद्दीत धोकादायक वळणावर आली असता कारचालकाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे आहे त्या वेगात पलटी घेत कार रस्त्यालगतच्या भिंतीला धडकली होती. या अपघातात कारमधील चारही युवक गंभीर जखमी आवस्थेत कारमध्येच अडकून पडले होते. रात्र गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल खाडे यांच्यासह कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले होते. चचेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य शहाजी पवार यांच्यासह ग्रामस्थांनीही अपघातस्थळी धाव घेतली होती.

जखमींचा जीव वाचविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक खाडे यांच्यासह ग्रामस्थांनी कारचे दरवाजे तोडून जखमींना रुग्णालयात पाठवले होते. मात्र अमर कचरे या युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. उर्वरित तीन युवकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. जयदीपच्या डोक्याला जबर मार लागल्याने व अधिक रक्तस्राव झाल्याने त्याच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन दिवस युद्धपातळीवर उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे जयदीपचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात ठार झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. अपघातात ठार झालेले अमर कचरे व जयदीप जाधव हे दोघेही एकुलती एक मुलं होती.

चौकट

नोकरीला जाण्यापूर्वीच काळाची झडप

जयदीपने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. पुणे येथील कंपनीत त्याचा इंटरव्ह्यू होऊन या आठवड्यात नोकरीस लागणार होता. त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली. जयदीपचे वडील स्टॅम्पव्हेंडर आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे.

Web Title: Another injured youth dies in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.