शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
7
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
8
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
9
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
10
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
11
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
12
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
13
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
14
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
15
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
16
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
17
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
18
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

आगळावेगळा सोहळा! साडीचा पाळणा... झाडांचं तोरण; उसाच्या फडात ‘संस्कृती’चं नामकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 16:26 IST

'प्रसूती झाली अन् आठव्या दिवशी मुलीला घेऊन कामावर. कुठलं बारसं अन् कुठलं काय'

सचिन काकडेसातारा : दोन महिन्यांपूर्वी त्या मातेची प्रसूती झाली. आपल्या लेकीला पोटाला कवटाळून तिने थेट सातारा गाठला. मग काय, हातात कोयता घेऊन त्या मातेची उसासोबत उदरनिर्वाहाची झुंज सुरू झाली. सातारा रोड येथील एका दाम्पत्याची त्या चिमुकलीवर नजर पडते. मुलीचे उसाच्या फडातच बारसे घातले जाते. तिचे नामकरणही केले जाते. ही कुठल्या चित्रपटातील कथा नव्हे, तर सातारा रोड (ता.कोरेगाव) येथील खरीखुरी घटना आहे.येथील संस्कृती महिला मंडळाच्या अध्यक्ष शीतल फाळके यांच्या शेतात बीड जिल्ह्यातून आलेल्या एका टोळीकडून ऊसतोड सुरू होती. यावेळी पती नीलेश फाळके यांनी शेतात एका मातेला दोन महिन्यांच्या मुलीसमवेत काम करताना पहिले. रंजना पडोळकर असे त्या मातेचे नाव. मुलीचे बारसे घातले का? असे विचारल्यानंतर त्या मातेने सांगितले, ‘माझी प्रसूती झाली अन् आठव्या दिवशी मी मुलीला घेऊन कामावर आले. कुठलं बारसं अन् कुठलं काय,’ हे ऐकून नीलेश फाळके यांना गहिवरून आले. त्यांनी सारी हकिकत पत्नी शीतल यांनी सांगितली. त्याच दिवशी शीतल यांचाही वाढदिवस होता. त्यांनी तो अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन केले.ठरल्याप्रमाणे शीतल फाळके महिलांसह उसाच्या फडात आल्या. येथे झाडांना साडीचा पाळणा बांधण्यात आला. त्याला फुग्यांची सजावट करण्यात आली. यानंतर, रंजना पाडोळकर यांच्या दोन महिन्यांच्या चिमुकलीला नवीन कपडे घालण्यात आले. पाळण्यात घालून तिचा नामकरण सोहळाही करण्यात आला. संस्कृती महिला मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत, हा अनोखा सोहळा साजरा केल्याने, त्या चिमुकलीने नावही ‘संस्कृती’ ठेवण्यात आले. यावेळी रंजना पाडोळकर यांची ओटीही भरण्यात आली. जरंडेश्वर केटरर्सचे संदीप फाळके, किसन घाडगे यांनी सर्वांना गोड-धोड खाऊ घातले.उसाच्या फडात पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचा आम्ही धागा झालो, असे मत अंगणवाडीसेविका स्वाती घाडगे, अनिता सुतार, वंदना ताटे, रूपाली सुतार, गौरी गाढवे, योगिता फाळके, भारती फाळके, रजनी घाडगे, अनुजा मिठारे, संगीता रावन, वंदना फाळके, सुमन वाघमारे, उर्मिला ताटे, रूपाली फाळके, शीतल जाधव, मनीषा फाळके यांनी व्यक्त केले.

ऊसतोड मजुरांची पोटासाठी कायमच वणवण सुरू असते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे ते फारसे लक्ष देत नाहीत. आज आम्ही त्या चिमुकलीचे केवळ बारसेच घातले नाही, तर तिच्या संपूर्ण शिक्षणाचीही जबाबदारी स्वीकारली आहे. ती मुलगी उद्या शिकली, मोठी झाली, तर नक्कीच ती तिची पुढची पिढी साक्षर करेल, असे आम्हाला वाटते. - शीतल फाळके, सातारा रोड-पाडळी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर