शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या रोगाने जनावरे दगावली माण तालुका : घटसर्पाची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 21:25 IST

‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ असं माणसाप्रमाणेच पाळीव जनावरांसाठीही म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. याचा परिणाम अलीकडच्या काही दिवसांत पशुपक्ष्यांमध्येही

सातारा : ‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ असं माणसाप्रमाणेच पाळीव जनावरांसाठीही म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. याचा परिणाम अलीकडच्या काही दिवसांत पशुपक्ष्यांमध्येही दिसू लागला आहे. साथीच्या रोगामुळे गेल्या दीड महिन्यात माण तालुक्यातील ६० हून अधिक जनावरे दगावल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनस्तरावर पशुसंवर्धन विभागाकडून साथीच्या रोगांवर नियंत्रण आण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.

माण तालुक्यात साथीच्या रोगामुळे दगावलेल्या जनावरांमुळे शेतक ऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकºयांनी जनावरांचा गोठा रोज स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे जनावरांना साथीची लागण होणार नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. माणमध्ये दगावलेल्या जनावरांना घटसर्प या रोगांची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविला आहे.

वातावरणातील बदलामुळे साथीचे रोग वाढतात. त्याबरोबरच गोठ्यामधील जनावरांना साथीच्या रोगांची लागण झाली असेल, तर त्याची बाधा अन्य निरोगी जनावरांना होऊ शकते. त्यामुळे आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठिकाणी बांधणे गरजेचे आहे. गोठ्यातील जनावरांचा मलमूत्र व स्त्राव याची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.प्रत्येक शेतकºयाने आपल्या जनावरांच्या खाद्यपदार्थामध्ये सोड्याचा वापर करावा, असे सांगण्यात येते. सोडा हा साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शेतकºयांने कळपात किव्ाां नवीन जनावर आणताना १० ते १५ दिवस स्वतंत्र्य ठेवून त्या जनावरांना कळपात आणण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात.माणमध्ये अधिकाºयांचा तीन दिवस मुक्कामगेल्या दीड महिन्यात माण तालुक्यात ६० हून अधिक जनावरे दगावले आहेत. हा प्रकार घडल्याने जिल्'ातील पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे. माण तालुक्यात या विभागाचे अधिकारी तीन दिवस मुक्कामी होते. या परिसरात दगावलेल्या प्रत्येक जनावरांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

माण तालुक्यातील दगावलेल्या जनावरांची संपूर्ण माहिती घेत आहे. त्या जनावरांचे रक्त तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहे. जनावरे कशाने दगावली, याची माहिती लवकरच मिळेल. अन्य तालुक्यांतील शेतकºयांनी आपल्या जनावरांची देखभाल घेणे गरजेचे आहे. ज्या शेतकºयांनी जनावरांना लसीकरण केलेले नाही त्यांनी जनावरांना लसीकरणासाठी संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे. - विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सातारा

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यूMedicalवैद्यकीय