शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावणीतही आता सुरू होणार अंगणवाड्या! कुटुंबीयांच्या संगतीतच गमभन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 21:46 IST

दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी शेतकरी धडपडत असून अनेक कुटुंबे सध्या चारा छावणीच्या आश्रयाला येत आहेत. त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने

ठळक मुद्देराज्याला दिशादर्शक ठरणारा सातारा जिल्हा परिषदेचा उपक्रम

नितीन काळेल।सातारा : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी शेतकरी धडपडत असून अनेक कुटुंबे सध्या चारा छावणीच्या आश्रयाला येत आहेत. त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने छावणीतच अंगणवाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुटुंबीयांबरोबर छावणीत वास्तव्यास आलेल्या मुलांना शिक्षणाचे धडे मिळणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता गेल्या चार महिन्यांपासून जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आवश्यक तेथे चारा छावण्या व टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.माण तालुक्यातील म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून एक चारा छावणी सुरू झाली आहे. तेथे सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील हजारो जनावरे आली आहेत. अनेक शेतकरी व कुटुंबीयांनीही छावणीतच आश्रय घेतला आहे. या ठिकाणी कुटुंबीयांबरोबरच लहान मुलेही आश्रयाला आली आहेत. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून जिल्हा परिषदेने अंगणवाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्ह्यात चारा छावणी सुरू होईल, तेथे आवश्यकता वाटल्यास अंगणवाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे कुटुंबीयांच्या जवळच या मुलांना शिक्षण व आहार मिळणार आहे. यासाठी जवळपासच्याच अंगणवाडी सेविका व मदतनीसांची नियुक्ती करण्यात येणार आहे.छावणीत पाच वर्षांपर्यंतची ३७ मुलेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी म्हसवडच्या चारा छावणीला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी कुटुंबातील लहान मुले शाळेत जातात का, असा प्रश्न केला. छावणीमुळे मुले येथेच असतात, असे सांगण्यात आले. त्यानंतर डॉ. शिंदे यांनी शिक्षण विभागाला छावणीत किती मुले आहेत, याचे सर्वेक्षण करण्याची सूचना केली. शिक्षण विभागाने केलेल्या या सर्वेक्षणात म्हसवडच्या छावणीत पाच वर्षांपर्यंतची ३७ मुले आढळली. त्यानंतर डॉ. शिंदे यांनी म्हसवडच्या छावणीत अंगणवाडी सुरू करण्याची सूचना संबंधितांना केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर