शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महिना २६ हजार मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By नितीन काळेल | Updated: November 28, 2023 19:30 IST

‘सीटू’ संघटनेच्या नेतृत्वाखाली सहभागी

सातारा : अंगणवाडी सेविकांना २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने (सीटू) मंगळवारी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यामध्ये शेकडोच्या संख्येत सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महागाई वाढत चालली आहे. या महागाईप्रमाणेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात यावी. तसेच अनेकवेळा चर्चा आणि कामावर बहिष्कार घालूनही शासनाने मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे आता ४ डिसेंबरपासून सेविका आणि मदतनीस सर्व कामकाज बंद करुन आणि अंगणवाडी बंद ठेवून बेमुदत संपावर जाणार आहेत.

अंगणवाडी सेविकेला २६ हजार आणि मदतनीसला २० हजार रुपये मानधन देण्यात यावे, या कर्मचाऱ्यांची पदे वैधानिक असून त्यांना मिळणारा मोबदला हे वेतनच आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करुन त्याअनुषंगाने वेतनश्रेणी आणि ग्रॅच्युईटी, भविष्यनिर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा लागू करण्यात याव्यात. मानधन वाढलेतरी महागाई दुपटीने वाढते. त्यामुळे महगाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी, पेन्शन देण्याचा प्रस्ताव मंत्र्यांनी मान्य केला आहे. त्यामुळे तो तयार करुन हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा. महानगर हद्दीत जाण्याचे निकष शिथील करुन अंगणवाड्यांसाठी ५ हजार ते ८ हजार रुपये भाडे मंजूर करावे, आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प आहे. त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याएेवजी वाढत आहे. परिणामी सर्वसाधारण बालकासाठी १६ आणि अति कुपोषित बालकासाठी २४ रुपये करावा, अशा आमच्या मागण्या आहेत, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.

अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये काॅ. माणिक अवघडे, प्रतीभा भोसले, चंद्रकला शिंदे, मनिषा काटकर, छाया पंडित, वैशाली लोहार, अर्चना भिसे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर