शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाईतील काशिविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीत आढळली पुरातन शस्त्रे, सतराव्या शतकातील शस्त्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 12:50 IST

महागणपती मंदिरालगतच्या काशीविश्वेश्वर मंदिर परिसरात फरसबंदी पुरातन आडवजा विहीर आहे

वाई : येथील महागणपती घाटावर गणपती मंदिरासमोर असलेल्या काशिविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीत गाळ काढताना सतराव्या शतकातील कट्यार व खंजीर ही शस्त्रे आढळून आली. ही शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.येथील महागणपती मंदिरालगतच्या काशीविश्वेश्वर मंदिर परिसरात फरसबंदी पुरातन आडवजा विहीर आहे. त्यात मोठा पाणी साठा असतो. या आडातील पाण्याचा अनेक वर्षात उपसा बंद असल्याने व देखभाली अभावी पाण्याला दुर्गंधी येत होती. मंदिराचे ट्रस्टी शैलेंद्र गोखले यांनी आडाची स्वच्छता करण्याच्या हेतूने गाळ काढण्यास मागील पंधरा दिवसांपासून सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि. १८) गाळ काढत असताना विहिरीत सात कट्यार आणि एक खंजीर आढळून आला.याबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ मंदिर परिसरात भेट देऊन पंचनामा करून शस्त्रे ताब्यात घेतली. याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, तहसीलदार रणजीत भोसले व सातारा येथील शिवाजी महाराज संग्रहाला कळविण्यात आले.

विहिरीत सापडलेल्या शस्त्रांची छायाचित्र पाहून सतराव्या शतकातील असावीत असा अंदाज येतो. लवकरच ही शस्त्रे संग्रहालयाच्या ताब्यात घेण्यात येतील  - प्रवीण शिंदे, अभिरक्षक, शिवाजी महाराज संग्रहालय

टॅग्स :Satara areaसातारा परिसर