म्हसवड : जिल्हा एकल शिक्षक सेवा मंचअंतर्गत कार्यरत असलेल्या माण तालुका कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये माण तालुका एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचच्या अध्यक्षपदी आनंद बडवे यांची निवड करण्यात आली. तसेच महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी अनुसया गोरे यांची निवड करण्यात आली.
राज्य एकल शिक्षक सेवा मंचचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार दांडिले, जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर यांच्या उपस्थितीत माण तालुका एकल सेवा मंचची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर यांनी राज्य पातळीवरील एकल शिक्षक सेवा मंचच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी माण तालुका एकल शिक्षक सेवा मंच कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून वावरहिरे केंद्रशाळेचे तंत्रस्नेही शिक्षक आनंद बडवे यांची निवड करण्यात आली, तर महिला अध्यक्ष म्हणून शिखर शिंगणापूर शाळेच्या अनुसया गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुका उपाध्यक्षपदी निलोफर देसाई, तर सरचिटणीसपदी कल्पना घाडगे यांची निवड करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर यांनी जाहीर केले.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनीषा महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीराम जाधव, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंगटे, विजय ढालपे, प्रताप अडसर, विद्याधर चव्हाण, दादासाहेब नरळे, दत्तात्रय कोळी, आनंद बडवे, अनुसया गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. उमेश काटकर यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण शिलवंत व धनंजय शिंगटे यांनी सूत्रसंचालन केले. सुरजकुमार निकाळजे यांनी आभार मानले.